Accident

 

sakal

देश

Car and Truck Accident : कार अन् ट्रकच्या भीषण अपघातात सहा ठार, तीन जखमी ; ट्रकचालक घटनास्थळावरून फरार

Severe Road Accident ट्रक वेगाने जात होता आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो विरुद्ध लेनमध्ये घुसल्याची माहिती समोर आली आहे

Mayur Ratnaparkhe

Deadly Car and Truck Collision in Banaskantha : गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात एसयूव्ही आणि ट्रकच्या धडकेत सहा जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत. बनासकांठा येथील अमीरगड येथील इक्बालगढ जवळ हा अपघात घडला. इसुझू ट्रक आणि इनोव्हा कारची धडक झाल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. सर्व मृत राजस्थानचे रहिवासी होते. 

पालनपूरहून राजस्थानला जात असताना हा अपघात झाला. उर्वरित तीन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. अमीरगड पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. समोरून येणाऱ्या इसुझू ट्रकने कारला धडक दिल्याने हा अपघात झाला.

ट्रक वेगाने जात होता आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो विरुद्ध लेनमध्ये गेला आणि एसयूव्हीला समोरासमोर धडकला. एवढंच नाहीतर यानंतर तो ट्रक कारवर आदळला आणि नंतर उलटला, ज्यामुळे कारमधील सर्वजण गंभीर जखमी झाले आणि या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्युमुखी झाला.

पोलिसांनी सांगितले की, हा अपघात संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आबू-पालनपूर महामार्गावरील इक्बालगढ गावाजवळ घडला. प्राथमिक तपासात पोलिसांनी सांगितले की, गुजरातहून राजस्थानला जाणारा एक ट्रक विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसयूव्हीला धडकला. अमीरगढ पोलिस स्टेशनचे निरीक्षक पी.डी. गोहिल यांनी सांगितले की, अपघातानंतर ट्रक चालकाने गाडी सोडून पळ काढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

Pune News : महापालिकेच्या सर्वपक्षीय कार्यालयांच्या सुशोभिकरणासाठी लाखोची उधळपट्टी

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Shirur Accident : पुणे-नगर रस्त्यावर एसटी बसच्या धडकेत दूचाकीस्वार तरूणाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT