case of a xe variant of corona reported in india know what are the symptoms xe variant rak94 Sakal
देश

कोरोनाचा व्हेरिएंट XE भारतात दाखल! जाणून घ्या नेमकी काय आहेत लक्षणे

सकाळ डिजिटल टीम

कोरोनापासून सुटका होत असताना एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कोविड 19 च्या नवीन व्हेरिएंटचा पहिले रुग्ण मुंबईत आढळून आला आहे. Omicron च्या XE व्हेरिएंटची लागण झालेला पहिला रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रासोबतच देशाची चिंता देखील वाढली आहे.

कोरोना विषाणूचा (coronavirus) नवीन व्हेरिएंट XE भारतातही दाखल झाल्याने चिंता वाढली आहे. दरम्यान Omicron च्या Kappa या व्हेरिएंटचे देखील एक प्रकरण आढळले आहे. तपासण्यात आलेल्या ३७६ नमुन्यांपैकी २३० मुंबईतील रहिवासी आहेत. जीनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळेतील चाचणीची ही 11वी बॅच होती. 230 नमुन्यांपैकी, 228 ओमिक्रॉनचे आहेत, उर्वरित 1 कप्पा प्रकारातील आणि 1 XE प्रकारातील आहे.

हा नवीन व्हेरिएंट युनायटेड किंगडममधून आला आहे. बीएमसीने आपल्या ताज्या सेरो सर्वेक्षणात म्हटले आहे की, शहरात XE व्हेरिएंट आणि कप्पा व्हेरिएंटच्या प्रत्येकी एक प्रकरणाची पुष्टी झाली आहे. एकूण २३० लोकांचे अहवाल सेरो सर्वेक्षणासाठी पाठवण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यापैकी २१ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोणालाही ऑक्सिजन किंवा गहन निरीक्षणाची आवश्यकता नाही.

आयआयटी कानपूरच्या अंदाजानुसार, जून २०२२ पर्यंत भारतात कोरोना संसर्गाची चौथी लाट येऊ शकते. मात्र, देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची नवी लाट पूर्वीसारखी प्राणघातक असेल अशी अपेक्षा नाही.

हा प्रकार वेगाने पसरणारा!

XE व्हेरिएंटबद्दल जागतिक आरोग्य संघटना म्हणते की, हा प्रकार ओमिक्रॉन प्रकारातील BA.1 आणि BA.2 या दोन प्रकारांनी बनलेला आहे. त्याची पहिली केस यूकेमध्ये आढळून आली. यावेळी त्याला XE व्हेरिएंट असे नाव देण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने भीती व्यक्त केली आहे की, हा प्रकार सर्वांत वेगाने पसरणारा सिद्ध होऊ शकतो.

XE ची लक्षणे काय आहेत?

लक्षणे काहींसाठी सौम्य असू शकतात आणि इतरांसाठी ती गंभीर असू शकतात.

रुग्णांमध्ये दिसून येणारी लक्षणे ही त्यांची लसीकरणाची स्थिती आणि पूर्वीच्या संसर्गातून मिळालेली प्रतिकारशक्ती यावर अवलंबून असतील, कोविड-19 विषाणूची लक्षणे आणि तीव्रता प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते.

लक्षात येण्यासारख्या काही लक्षणांमध्ये - ताप, घसा खवखवणे, खोकला आणि सर्दी, त्वचेची जळजळ आणि रंग मंद होणे, जठरांत्रीय त्रास इत्यादी असू शकतात

गंभीर आजारांची काही लक्षणे म्हणजे हृदयविकार, धडधडणे आणि काहीवेळा विषाणूमुळे मज्जातंतूंचे गंभीर आजारही होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Drone Delivery Service: दूध, किराणा, पॅकेजेस… सगळं थेट ड्रोनने घरी पोहोचणार! मुंबईत पहिली निवासी ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरू होणार, पण कधी?

Property Tax : नियमीत करदात्यांना २५ टक्के सवलत द्या; अभय योजनेतून तीन दिवसात १५.२७ कोटी वसूल

Pune Water Supply Close : पुणे शहराच्या बहुतांश भागाचा पाणी पुरवठा गुरूवारी राहणार बंद

Deglur Nagarparishad Election : नगराध्यक्षपदासाठी ११ उमेदवारी अर्ज; तर नगरसेवकपदासाठी १८९ जणांचा अर्ज

SCROLL FOR NEXT