mallikarjun kharge and rahul gandhi sakal
देश

Caste Census: बिहारनंतर 'या' चार राज्यांतही होणार जातनिहाय जनगणना; राहुल गांधींची घोषणा

सुप्रीम कोर्टानं नुकतेच बिहारच्या जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यावर बंदीची मागणी याचिका फटाळून लावली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : बिहारनंतर इतर चार राज्यांतही जातनिहाय जनगणना करण्यात येणार आहे. ही चारही राज्ये काँग्रेसशासित राज्ये आहेत. त्यामुळं काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली. (Caste Census will be conducted in four states after Bihar Rahul Gandhi announcement)

कोणत्या राज्यात होणार जातीय जनगणना?

कर्नाटक, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये जातीय जनगणना केली जाणार आहे. बिहारच्या धर्तीवर ही जातनिहाय जनगणना केली जाणार आहे. सुप्रीम कोर्टानं बिहारच्या जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका नुकतीच फेटाळली. यानंतर काँग्रेसनं आपलं सरकार असलेल्या राज्यांमध्ये जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. (Marathi Tajya Batmya)

बिहारमध्ये पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना

बिहारमध्ये नितीशकुमार सरकारनं देशात पहिल्यांदा जातनिहाय जनगणना केली. याची आकडेवारी गांधी जयंतीचं औचित्य साधत २ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली. या आकडेवारीनुसार, हिंदूंची संख्या ८१.९९ टक्के आहे. तर मुस्लिमांची संख्या १७.७ टक्के, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन धर्मियांची लोकसंख्या १ टक्क्याहून कमी आहे. तर बिहारमधील २,१४६ लोक निधर्मी आहेत. (Latest Marathi News)

बिहारमध्ये कोणत्या वर्गाची लोकसंख्या किती?

सर्वसाधारण वर्ग - १५.२२ टक्के

मागास वर्ग - २७.१२ टक्के

ओबीसी - ३६.१ टक्के

अनुसुचीत जाती - १९.६५ टक्के

अनुसुचीत जमाती - १.६८ टक्के

बिहारमध्ये कोणत्या समाजाची लोकसंख्या किती?

ब्राह्मण - ३.६७ टक्के

राजपूत - ३.४५ टक्के

भूमिहार - २.८९ टक्के

कायस्थ - ०.६० टक्के

यादव - १४.२६ टक्के

कुरमी - २.८७ टक्के

तेली - २.८१ टक्के

मुसहर - ३.०८ टक्के

सोनार - ०.६८ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT