Ice-Cream Seller 
देश

VIDEO: आईसक्रीम विक्रेत्याचं अत्यंत किळसवाणं कृत्य, फालुदामध्ये चक्क..; लोकांच्या संतापानंतर पोलिसांची कारवाई

Video Of Ice-Cream Seller: तेलंगणाच्या वारंगल जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला आईसक्रीम विकणाऱ्या एकाने अत्यंत किळसवाणा प्रकार केला आहे.

कार्तिक पुजारी

हैद्राबाद- तेलंगणाच्या वारंगल जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला आईसक्रीम विकणाऱ्या एकाने अत्यंत किळसवाणा प्रकार केला आहे. विक्रेत्याने हस्तमैथून करुन फालुदामध्ये आपले विर्य टाकल्याचा दावा करण्यात येत आहे. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये आईसक्रीम विक्रेता आक्षेपार्ह कृती (सार्वजनिक ठिकाणी) करत असताना दिसत आहे..

कालुराम कुरबिया असं आरोपीचे नाव आहे. तो नेख्खोंडा भागात आईसक्रीम विकतो. कुरबिया हा राजस्थानचा रहिवाशी आहे. व्हिडिओमध्ये तो आक्षेपार्ह कृती करताना दिसत आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास केला जात आहे. एकाने हा व्हिडिओ शूट करुन सोशल मीडियावर शेअर केला होता.(Caught on camera video of Hawker masturbates into ice cream in Telangana arrested)

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संताप निर्माण झाला होता. अन्न अधीक्षकांनी या प्रकरणी काही सॅम्पेल मिळवले आहेत. कुरबिया विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह कृती करणे या भारतीय दंड संहितेच्या कलम २९४ अंतर्गत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी घटनेतील कृतीचा नेमका प्रकार स्पष्ट केलेला नाही. पण, तो काहीतरी आक्षेपार्ह करत होता, असं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, बाहेरचं काही खाताना लोकांनी विचार करण्याची गरज आहे. काही लोकांकडून स्वच्छतेला काहीही महत्व दिलं जात नाही. अशाच प्रकारचे किळसवाणे व्हिडिओ सोशल मीडियावर याआधी व्हायरल झाले आहेत. त्यामुळे बाहेरचं खाताना लोकांनी काळजी घ्यावी असं प्रशासन आवाहन करत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Adityanath Mobile Number: अधिकारी काम करत नाहीत? CM योगींकडे करा थेट तक्रार! मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा मोबाईल नंबर

Harbhajan Singh : रोहित शर्माला ODI कर्णधारपदावरून हटवल्याने हरभजन सिंग खवळला, शुभमन गिलबाबत म्हणाला...

Marathi Movie : तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!

Ajit Agarkar: रोहित शर्मासाठी परतीचा प्रवास सुरू? कर्णधारपदावरून दूर करण्याची माहिती दिली होती,आगरकर

Kolhapur Bhishi Scam : विश्वासू मित्र म्हणून भिशी भरायला दिली, अन् ४० महिलांना पती, पत्नीने २५ लाखांना गंडवलं...; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT