Lalu Prasad Yadav and Nitish Kumar 
देश

लालू-राबडी यांच्यासह १६ जणांविरुद्ध सीबीआयची चार्जशीट; नितीश कुमार म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

पाटणा : जमिनीच्या बदल्यात नोकऱ्या दिल्याप्रकरणी सीबीआयने लालूप्रसाद यादव, राबडी देवी यांच्यासह १६ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार लालू प्रसाद यादव कुटुंबाच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. (Lalu Prasad Yadav news in Marathi)

नितीश कुमार म्हणाले आरोपपत्रात काहीही नाही. आम्ही एकत्र आलो आहोत, त्यामुळे भाजप वाट्टेल ते करत आहे. याला काहीही अर्थ नाही. सध्या बिहारमध्ये जेडीयू-आरजेडी युतीचे सरकार आहे. तर लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव हे नितीश सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहे.

मागील आघाडी सरकारच्या काळात लालू यादव कुटुंबावर जमिनीच्या बदल्यात नोकऱ्या दिल्याचा आरोप झाल्यानंतर नितीश कुमार यांनी आरजेडीशी संबंध तोडले होते. तसेच 2017 मध्ये भाजपसोबत सरकार स्थापन केले होते.

नितीश कुमार यांनी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, प्रशांत किशोर यांनी मला जेडीयू पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा सल्ला दिला होता. किशोर यांच्या पदयात्रेबद्दल काय सांगू, ते माझ्या घरी राहत असे. त्यांना जे बोलायचं ते बोलू द्या, मला फरक पडत नाही, असंही नितीश यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT