chanda kochar Esakal
देश

Videocon Fraud : ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना 3 दिवसांची सीबीआय कोठडी

चंदा कोचर ह्या सीईओ असतांना आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉन ग्रुपला ३ हजार २५० कोटींचं कर्ज दिल्याचा आरोप आहे

सकाळ डिजिटल टीम

आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयने अटक केल्यानंतर आज तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआयने ही कारवाई कथित कर्ज फसवणूक प्रकरणात केलेली आहे. चंदा कोचर ह्या सीईओ असतांना आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉन ग्रुपला ३ हजार २५० कोटींचं कर्ज दिल्याचा आरोप आहे. शिवाय त्यांच्यावर अनिमिततेचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. अटक केल्यानंतर आज म्हणजेच शनिवारी मुंबईतील विशेष सीबीआय कोर्टासमोर त्यांना हजर करण्यात आले.

त्यानंतर आज सीबीआयच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आयसीआयसीआय बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना तीन दिवसांची रिमांड दिली आहे. या प्रकरणावरील सीबीआयच्या वकिलांनी सांगितले होते की, आम्ही दोन्ही आरोपींना (आयसीआयसीआय बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना नोटिसा दिल्या होत्या, परंतु त्यांनी सहकार्य केले नाही, म्हणून आम्ही त्यांना अटक केली आहे.

सीबीआयने काल (शुक्रवारी) ICICI बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांच्यावर 2012 मध्ये व्हिडीओकॉन ग्रुपला बँकेने दिलेल्या कर्जाशी संबंधित फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

याआधी ईडीने 3,000 कोटी रुपयांच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला होता. त्याचवेळी या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर चंदा कोचर यांना 2018 मध्ये आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले होते. सध्या कोचर दाम्पत्याला सीबीआयने फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली अटक केली असून न्यायालयाने त्यांची 3 दिवसांची कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: १७ चेंडूंत ८८ धावांचं वादळ... वैभव सूर्यवंशीची विक्रमी खेळी अन् RR ची Point Table मध्ये उलथापालथ

Parth Pawar Clarification : प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करणार? पार्थ पवारांनी दिले स्पष्टीकरण; 'ही केवळ स्नेहभेट'

RR vs LSG Live: वैभव सूर्यवंशीने मोठा विक्रम मोडला; फिफ्टीनंतर 'A' सेलिब्रेशनची रंगलीय चर्चा... नेमका त्याचा अर्थ काय? Video Viral

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

SCROLL FOR NEXT