CBI Raid on bhola yadav in case of land for job 
देश

CBI Raid : लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय भोला यादव यांना सीबीआयकडून अटक

सीबीआय भोला यादव यांच्या पाटणा येथील दोन ठिकाणांवर तपास करत आहे.

सकाळ डिजिटल टीम

सीबीआय भोला यादव यांच्या पाटणा येथील दोन ठिकाणांवर तपास करत आहे.

नोकरी घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांचे तत्कालीन ओएसडी भोला यादव यांना सीबीआयने आज सकाळी दिल्लीतून अटक केली आहे. यासंदर्भात भोला यादव यांच्या पाटणा आणि दरभंगा येथील ठिकाणांवर सीबीआयकडून तपास सुरु आहे. याप्रकरणी आज भोला यादव यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे. (CBI Raid and arrested to bhola yadav in case of land for job)

दरम्यान, सीबीआयच्या पथकाने आज सकाळी ६ वाजता दरभंगा येथील भोला यादवच्या घरावर छापा टाकला आहे. माजी आमदारांच्या गंज भैरोपट्टी यांच्या निवासस्थानी सीबीआय पथक दाखल झाले आणि त्यांनी चौकशी करण्यास सुरुवात केली. दरम्यान, काही क्षणातच कार्यकर्त्यांसह ललित यादव यांना बोलावण्यात आले. त्यानंतर या पथकाने खोल्यांची झडती घेतली. मात्र तेथे काही आढळून आले नाही.

सुमारे दोन तास चाललेल्या या छाप्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्याने दोन प्रतींमध्ये एक पेपर तयार केला आहे. त्याची प्रत भोला यादवच्या कार्यकर्त्याला दिल्यानंतर हे पथक माघारी गेले आहे. त्यामुळे सीबीआयने अचानाक टाकलेल्या या छाप्याची माहितीही कोणालाही मिळालेली नाही. परंतु अधिकारी गेल्यानंतर मात्र ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणात भोला यादव हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. त्यामुळे सीबीआयकडून यादव यांच्या पाटणामधील दोन ठिकाणांवर तपास सुरु आहे. यातील एक ठिकाण यादव यांच्या सीएचे असून दरभंगा येथील दोन ठिकाणी तपास सुरू आहे. सीबीआयने 18 मे रोजी याप्रकरणी लालू यादव, राबडी देवी, मिसा भारती आणि इतरांविरोधात एफआयआर नोंदवला होता.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून लालू यादव यांच्यावर आरोग्याच्या समस्यांमुळे उपचार सुरु आहेत. अलिकडेच त्यांच्यावर एक शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. यानंतर त्यांना एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला होता. लालू यादव यांची मुलगी रोहिणी आचार्यनी एक फोटो शेअर केला आहे, यात ती राबडी देवी आणि लालू प्रसाद यादव यांच्यासोबत दिसत आहे.

लालू यादव यांना 6 जुलै रोजी सायंकाळी उशिरा एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या मंगळवारपासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याने दोन-तीन दिवसांत त्यांना डिस्चार्ज मिळेल, अशी माहिती मिळाली होती. यादव यांच्या खांद्याला फ्रॅक्चर असून ते काढण्यासाठी चार ते सहा आठवडे लागणार आहेत. त्यामुळे लालू यादव हे सध्या त्यांच्या मोठी मुलगी मीसा भारतीसोबत दिल्लीतच राहणार असल्याचे माहिती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

SCROLL FOR NEXT