cbi raids on manish sisodia house aap mp sanjay singh and bjp anurag thakur statement  
देश

Manish Sisodia : सिसोदियांच्या घरावर CBI च्या छापेमारीनंतर आप-भाजप आमनेसामने

सकाळ डिजिटल टीम

आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी मनीष सिसोदिया यांच्या घरावरील सीबीआयच्या छापेमारीली राजकीय षडयंत्र म्हटले आहे. मद्य धोरण तपासणे हा त्याचा उद्देश नसून अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियतेला आळा घालणा हा हेतू असल्याचे त्यांनी म्हटले आहे . नरेंद्र मोदींचा खरा चेहरा समोर आला असून भाजपच्या दिल्लीच्या शैक्षणिक मॉडेलवर ते नाराज आहेत असे त्यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की, अमेरिकेतील वर्तमानपत्रही सिसोदियाचे कौतुक करतात. नरेंद्र मोदींना भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचे नाही, तर त्यांना विरोधकांना त्रास द्यायचा आहे. भाजपचे भ्रष्टाचारी देशभर फिरत आहेत. नेहमी दुसऱ्या पक्षावर सीबीआयचे छापे पडतात, कारण सीबीआयची कारवाई ही भाजपची निराशा आणि संतापाचा परिणाम असल्याचे ते म्हणाले आहते.

ते पुढे म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत भाजपला एकच चिंता आहे की केजरीवाल यांना रोखायचे कसे, पण आता मुख्यमंत्री केजरीवाल यांना कोणीही रोखू शकणार नाही. शिक्षणमंत्र्यांना तुरुंगात टाकण्याची तयारी सुरू असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान हे सर्व चिडून करत आहेत. केजरीवाल यांची लोकप्रियता रोखणे हा सीबीआय छाप्यांमागील हेतू असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान भाजपचे नेते केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर कथित भ्रष्टाचार प्रकरणी निशाणा साधला आहे. एखाद्या भ्रष्ट व्यक्तीने आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो भ्रष्टच राहील. तुमच्या विरोधात भ्रष्टाचाराची ही पहिलीच घटना नाही. दिल्लीतील दारूच्या दुकानांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे, असे ते म्हणाले.

सीबीआय चौकशीचे आदेश दिले त्याच दिवशी दिल्लीचे दारू धोरण मागे घेण्यात आल्याचा आरोप केंद्रीय मंत्र्यांनी केला. जर दारू धोरणात घोटाळा झाला नसेल तर ते मागे का घेतले? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

केजरीवाल भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ठाकूर म्हणाले, सत्येंद्र जैन जेव्हा भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात गेले, तेव्हाही त्यांनी त्यांना कामावरून काढून टाकले नाही आणि नंतर जैन यांनी दावा केला की त्यांची स्मरणशक्ती गेली होती. आज सीबीआयने दिल्ली-एनसीआरमधील 21 ठिकाणी छापे टाकले, ज्यात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे घर आणि दिल्लीचे तत्कालीन उत्पादन शुल्क आयुक्त अरवा गोपी कृष्णा यांच्या ठिकाणांचा देखील समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Abdul Rahman : कोण आहे अब्दुल रहमान? ज्यानं भाजप नेत्याची धारदार शस्त्रानं केलीये हत्या, रहमानवर 'इतक्या' लाखांचं होतं बक्षीस!

Pune Rape Case: पुणे अत्याचार प्रकरणात ट्विस्ट! दोघांची आधीपासूनच ओळख, स्वतःच लिहली धमकी... स्प्रेचा वापर नाही, काय समोर आलं?

Sushil Kediya : मराठीत विचारताच चर्चेतून पळ काढला, ३० वर्षांपासून मुंबईत करतोय काय? कोण आहे सुशील केडिया?

शाळेच्या पहिल्याच दिवशी सातवीतल्या मुलाचा सायलंट हार्ट अटॅकने मृत्यू, नेमकं काय घडलं? CCTV फूजेट आलं समोर

SCROLL FOR NEXT