Diya Namdev_CBSE topper
Diya Namdev_CBSE topper 
देश

CBSE 10th Result : 100 टक्के गुण मिळवत दिया नामदेव ठरली नॅशनल टॉपर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सीबीएसईचा दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील दिया नामदेव या विद्यार्थीनीनं शंभर टक्के गुण मिळवत राष्ट्रीय स्तरावर अव्वल स्थान पटकावलं आहे. तिच्या या यशासाठी जिल्ह्यात तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (CBSE 10th Result Diya Namdev became National Topper by scoring 100 percent marks)

दिया नामदेव ही शामली येथील स्कॉटिश इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थीनी आहे. तिनं ५०० पैकी ५०० गुण मिळवले आहेत. म्हणजेच सर्व विषयांमध्ये तिने पैकीच्या पैकी गुण मिळवले असून एकही गुण तिनं गमावलेला नाही. तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, सीबीएससीचा बारावीचा निकालही आज जाहीर झाला. या परीक्षेत सिल्व्हर बेल्स पब्लिक स्कूलची विद्यार्थीनी अपूर्वा तायल आणि बीएसएम स्कूलची विद्यार्थीनी प्रियांशी देशवाल यांनी संयुक्तरित्या ९९.६० टक्के गुण मिळवले आहेत. या दोन्ही विद्यार्थ्यींनींनी जिल्ह्यांत सर्वाधिक गुण मिळवले आहेत.

सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल रखडल्यानं महाराष्ट्रात अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडली होती. कारण राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल लागूनही पंधरा दिवसांहून अधिक काळ गेला आहे. पण आता सीबीएसईचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या केंद्रीय प्रवेशाची प्रक्रियेला वेग येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NDA Meeting : अयोध्येवर मोदी नाराज? रामाचा भक्तिमार्ग सोडून जगन्नाथाकडे धाव; NDAच्या बैठकीतलं मोदीचं 'ते' विधान चर्चेत

Pune Crime : घटस्फोटीत पत्नीसोबत लग्न करणाऱ्या तरुणाला कोयत्याने वार करून संपवलं; भर दुपारी घडलेल्या प्रकाराने खळबळ

Youtube Glitch : तुमच्या पण युट्युबवरचं लाईक बटन होऊ शकतं गायब; वापरकर्ते अन युट्युबर्स झालेत हैराण,जाणून घ्या काय आहे प्रकरण

Monsoon Skin Care : पावसाळ्यात स्कीन केअरसाठी या गोष्टी करा, चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरतील

Sourabh Netavalkar : मन उधाण वाऱ्याचे... पाकिस्तानला रडकुंडीला आणलेल्या सौरभ नेत्रावळकरचा स्विंग अन् सूरही एक नंबर

SCROLL FOR NEXT