Andhra Pradesh Crime News Esakal
देश

CCTV Viral Video: केबल दुरुस्तीसाठी आला अन् आवळला गळा, वृद्ध महिलेची जीवासाठी धडपड कॅमेऱ्यात कैद

Andhra Pradesh Crime News: या घटनेच्या व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये खाली बसलेल्या महिलेच्या गळ्याभोवती हा चोर टॉवेलने गुंडाळून तिचा खून करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

आंध्र प्रदेशातील गवरापलेम येथून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका केबल टेक्निशियनने गेल्या आठवड्यात वृद्ध महिलेची सोनसाखळी चोरण्यासाठी तिच्याच घरात गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला.

या घटनेच्या व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये खाली बसलेल्या महिलेच्या गळ्याभोवती हा केबल टेक्निशियन टॉवेलने गुंडाळून तिचा खून करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा केबल टेक्निशियन 67 वर्षीय महिलेची सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न करत होता.

ही घटना आंध्र प्रदेशातील गवरापलेम येथे २६ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. हल्ल्यानंतर, महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे केबल टेक्निशियनवर खून आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेपासून फरार असलेल्या गोविंद या आरोपीला शोधण्यासाठी पोलीस सध्या प्रयत्न करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News :सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला सुरुवात...

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT