Car Accident esakal
देश

Delhi Accident Video: धक्कादायक! भरधाव कारने 3 मुलांना चिरडलं, एकाची प्रकृती गंभीर

दिल्लीतील गुलाबीबागमध्ये रविवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली

रुपेश नामदास

दिल्लीतील गुलाबीबागमध्ये रविवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. येथे फूटपाथवर उभ्या असलेल्या तीन मुलांना एका भरधाव कार चिरडले , या अपघातानंतर एका मुलाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

ड्रायव्हरचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार फुटपाथवर चढल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात जखमी झालेल्या दोन मुलांची प्रकृती चांगली असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली असून रस्त्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ती कैद झाली आहे.

या घटनेचा सीसीटीव्हीही समोर आला असून, त्यात भरधाव कार स्पष्ट दिसत आहे. अपघातानंतर स्थानिक लोक धावताना दिसत आहेत. दुसरीकडे, या घटनेबाबत दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आज सकाळी गुलाबी बाग परिसरात एका वेगवान कारने 3 मुलांना धडक दिली, 2 मुलांना किरकोळ दुखापत झाली, तर तिसर्‍याची प्रकृती गंभीर पण स्थिर असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Changes: गणेशोत्सवात पुण्यात मोठा वाहतूक बदल; 12 ते 26 सप्टेंबरपर्यंत 'या' रस्त्यांवर जड वाहनांना बंदी

रखडलेल्या ठाकुर्ली उड्डाणपुलाला मुहूर्त, सात खासगी मिळकतींचा प्रश्न मार्गी; १० वर्षांचा तिढा सुटला

iPhone 18 लाँच होताच जुन्या iPhoneच्या किमती वाढल्या! iPhone 17, iphone 17 pro सह कोणते मॉडेल महागले?

Marathi News Live Updates :गौतमी पाटलांविरोधात भाजप नेत्या आक्रमक, अश्लील हावभाव केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार

क्रिकेटच्या कारभारात मोठा बदल होणार? सर्वोच्च न्यायालयाने BCCIसमोर उपस्थित केला ‘हा’ सवाल; १२ वर्षांपासून प्रलंबित प्रकरण पुन्हा चर्चेत

SCROLL FOR NEXT