Bipin Rawat Last Rites Ani
देश

अलविदा जनरल : बिपिन रावत अनंतात विलिन, पती-पत्नीला एकाचवेळी निरोप

हेलिकॉप्टर दुर्घटनेतील सर्व मृतांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत (Tamil Nadu Helicopter Crash) सीडीएस बिपीन रावत (CDS Bipin Rawat Death) यांच्यासह त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर ११ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. आज रावत यांना 17 तोफांची सलामी देत दिल्लीतील छावणी परिसरात लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार (Bipin Rawat Last Rites) करण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नीला देखील अखेरचा निरोप देण्यात आला.

सीडीएस जनरल बिपीन रावत अंत्यसंस्काराचे दिवसभरातील अपडेट्स

बिपिन रावत यांना १७ तोफांची सलामी. मुलींने दिला मुख्नागी

बिपिन रावत यांच्या मुली कृतिका आणि तरीणी दोघींनीही आई-वडिलांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बिपिन रावत यांना वाहिली अखेरची श्रद्धांजली.

डीआरडीओचे प्रमुख डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी बिपिन रावत यांना वाहिली श्रंद्धाजली.

सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचे पार्थिव दिल्लीतील छावणी परिसरातील ब्रार चौकातील स्मशानभूमीत नेण्यात आले असून थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होणार आहेत.

CDS बिपीन रावत यांची अंत्ययात्रा निघाली असून, मोठ्या शोकाकूल वातावरणात लोक त्यामध्ये सहभागी झाले आहेत. पुढच्या काही वेळातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर लष्कराकडून आणि प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. लष्करी वाहनातून त्यांचं पार्थिव स्मशानभूमीकडे (Funeral of CDS Bipin Rawat) आणण्यात आलं आहे.

लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे, वायु दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार या तिन्ही दलांच्या प्रमुखांनी सीडीएस बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहिली.

श्रीलंका, भूटान, बांगलादेश आणि नेपाळच्या लष्कराच्या प्रमुखांची बिपीन रावत यांच्या अंसस्काराला उपस्थिती.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह IAF हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.

ब्रिगेडियर एल.एस. लिड्डर यांच्या पत्नी आणि मुलीने त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं असून, त्यांच्या पार्थिवाला काही वेळातच मुखाग्नी देण्यात येणार आहे.

बिपीन रावत यांचं पार्थिव छावणीतील बरार स्व्केअर येथं आणण्यात आलं आहे. जनरल रावत यांना अखेरचा निरोप देण्यात येणार असून, गृहमंत्री अमित शहा हे रावत यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे आणि इतर काही नेते देखील त्याठीकाणी पोहोचले आहेत.

ब्रिगेडियर एल.एस. लिड्डर यांच्या पत्नी आणि मुलीने देखील त्यांना अखेरची मानवंदना दिली. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देखील त्यांना मानवंदना दिली.

ब्रिगेडीयर लखविंदर सिंग लिड्डर (Brig LS Lidder) यांचं पार्थिव सध्या दिल्लीत पोहोचलं असून, बरार स्क्वेअर परिसरात त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेल्या सर्व शहीदांना आज दुपारी ४ पर्यंत अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. CDS जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर ११ शहीदांचं पार्थिवांचं ११ वाजेपासून मानवंदना देण्यासाठी बरार स्क्वेअर परिसरात ठेवण्यात येणार आहे.

हेलिकॉप्टर अपघातात (Helicopter Crash) शहीद झालेल्या लष्करी अधिकाऱ्यांचे पार्थिव दिल्लीत आणले जात आहेत. त्यातील ब्रिगेडीयर लखबिंदर सिंग लिड्डर (Brig LS Lidder) यांचं पार्थिव सध्या दिल्लीत पोहोचलं असून, बरार स्क्वेअर परिसरात त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Dombivli Election : आमदारांच्या मुलाचा बिनविरोध विजय; कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाची घोडदौड वेगात!

Sudhakar Badgujar : नाशिक भाजपमध्ये बडगुजर पॅटर्नचा धमाका; पत्नी आणि पुत्रासह स्वतःची उमेदवारी केली निश्चित

Latest Marathi News Live Update : एरंडोल नगरपालिका निवडणुकीत पाच अविवाहित युवकांचा विजय

BEE Star Rating : इलेक्ट्रॉनिक वस्तु खरेदीचे नियम बदलले; लागू झाला BEE स्टार रेटिंगचा आदेश, थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम

Khus Khus Halwa: गाजर किंवा मूगडाळीचा हलवा विसरा! या हिवाळ्यात ट्राय करा पौष्टिक आणि चविष्ट ‘खसखस हलवा’

SCROLL FOR NEXT