रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस esakal
देश

'या' केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी! पगारात मिळणार अतिरिक्त पैसे

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : केंद्र सरकारने रेल्वेच्या कर्मचाऱ्यांबाबत (Railway employee) मोठा निर्णय घेतला आहे. सरकारकडून आर्थिक वर्ष २०२०-२१ बोनस (PLB) देण्याची घोषणा करण्यात आली असून बोनसचे हे पैसे ७८ दिवसांच्या पगाराइतके असतील. आरपीएफ आणि आरपीएसएफ कर्मचाऱ्यांना वगळता रेल्वेच्या सर्वच पात्र कर्मचाऱ्यांना हा बोनस दिला जाणार आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे रेल्वेच्या जवळपास ११.५६ लाख कर्मचाऱ्यांना या बोनसचा फायदा होण्याची शक्यता आहे. योग्य रेल्वे कर्मचाऱ्यांना दसऱ्याच्या सुट्टीवेळी हा बोनस दिला जातो. आर्थिक वर्ष २०१० -११ पासून २०१९-२० पर्यंत बोनस देण्यात आला होता. आता २०२०-२१ चा ७८ दिवसांच्या पगाराइतका बोनस दिला जाणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये सुधारणा होणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटलं आहे.

सर्व कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी केंद्र सरकारचे जवळपास १९८४.७३ कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना पीएलबीसाठी दरमहा 7,000 रुपये वेतन गणना मर्यादा निश्चित केली आहे. प्रत्येक पात्र रेल्वे कर्मचाऱ्याला 78 दिवसांसाठी जास्तीत जास्त देय रक्कम 17,951 रुपये असेल, असेही केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT