Amit Shah esakal
देश

पंजाबात 'आप'चं सरकार स्थापन होताच केंद्राचा नवा नियम; अमित शहांची घोषणा

सकाळ डिजिटल टीम

लोकसभेत पंजाबच्या अनेक खासदारांनी अधिसूचना जारी न करण्याची मागणी केली होती.

चंदीगड : केंद्र सरकारनं (Central Government) चंदीगडमध्ये केंद्रीय सेवा नियम (Central Service Rules) लागू करण्यासाठी अधिसूचना जारी केलीय. गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी नुकतीच ही घोषणा केलीय. मात्र, पंजाबमध्ये याला कडाडून विरोध होत आहे. काल लोकसभेत पंजाबच्या अनेक खासदारांनी अधिसूचना जारी न करण्याची मागणी केली होती.

चंदीगडमधील धनास येथील पोलीस (Police) गृहनिर्माण संकुलाच्या उद्घाटनप्रसंगी शाहांनी केंद्रीय सेवा नियम लवकरच लागू होणार असल्याचं चंदीगड प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं. चंदीगड प्रशासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांना एक गोड बातमी द्यायचीय, असं शाह म्हणाले होते. चंदीगड (Chandigarh) प्रशासनातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्ती केंद्राच्या सेवा नियमांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळं कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार असून याचा लाभ आता प्रशासनातील सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

आता निवृत्तीचं वय 58 ते 60 वर्षे असेल. त्याचबरोबर शिक्षण विभागाशी संबंधित सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं निवृत्तीचं वय 65 असणार आहे. तर, प्राध्यापकांचं सेवानिवृत्तीचं वय 60 ते 65 वर्षे असेल, असं त्यांनी जाहीर केलंय. त्याचबरोबर शिक्षकांना प्रवास भत्ता, दरमहा सुमारे 4000 रुपयांपर्यंत वेतनश्रेणी मिळणार आहे. तसेच महिला कर्मचाऱ्यांना बाल संगोपनासाठी दोन वर्षांची रजाही मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'Ajinkya Rahane ने बुडणारं जहाज वाचवलेलं, पण त्याला श्रेय मिळालं नाही...', गावसकरांचा भारतीय क्रिकेटवर निशाणा

Jayakwadi Dam Water Release: जायकवाडी नाथसागर धरणातून गोदावरीत १० हजार क्युसेक विसर्ग; नदीपात्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

MS Dhoni: रेसिंग ट्रॅकवर 'माही'चा जलवा! मद्रास सर्कीटवर धोनीने पळवली सुपरबाईक, Video तुफान Viral

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये येणार ‘पिंक प्लॅटफॉर्म’! महिला प्रवाशांसाठी मोठा निर्णय; कसा असणार उपक्रम?

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत मोठी कारवाई! विद्यार्थ्यांवर ड्रग्जमाफियांचा डोळा, ४१.६० लाखांच्या अमली पदार्थांसह तस्कर जेरबंद

SCROLL FOR NEXT