Corona Test esakal
देश

देशात सीरो सर्व्हे, गावखेड्यात होणार चाचण्या

किती लोकांच्या शरीरामध्ये कोरोनाशी लढण्यासाठी अँटीबॉडी निर्माण झाल्या आहेत, याचीही माहिती मिळणार आहे.

वृत्तसंस्था

किती लोकांच्या शरीरामध्ये कोरोनाशी लढण्यासाठी अँटीबॉडी निर्माण झाल्या आहेत, याचीही माहिती मिळणार आहे.

नवी दिल्ली : देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याची चिन्हे दिसत आहेत, पण तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचाही इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात चौथा सीरो सर्व्हे (Sero Survey) करण्यात येणार आहे. या अंतर्गत २८ हजार नमुने गोळा करण्यात येणार आहेत. सीरो सर्व्हेमध्ये १४ हजार मुले आणि १४ हजार वयस्कर व्यक्तींचा समावेश करण्यात येणार आहे. सर्व्हेला जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरवात होणार आहे. सर्व्हेदरम्यान ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. कोरोनाची तिसरी लाट, ग्रामीण भाग आणि लहान मुलांवर परिणाम होण्याची शक्यता या गोष्टींवर लक्ष ठेवून सीरो सर्व्हे करण्यात येणार आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) या सर्व्हेचं नेतृत्व करणार आहे. (Central govt will conduct a fourth national sero survey to monitor spread of Coronavirus)

लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशमध्ये ४ जूनपासून सीरो सर्व्हेला सुरवात करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशच्या ७५ जिल्ह्यात होणाऱ्या सीरो सर्व्हेतून कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या भागात कोरोनाचे संक्रमण किती प्रमाणात पसरले आहे, तसेच किती लोक कोरोनाने संक्रमित आहेत, ही माहिती मिळेल. तसेच किती लोकांच्या शरीरामध्ये कोरोनाशी लढण्यासाठी अँटीबॉडी निर्माण झाल्या आहेत, याचीही माहिती मिळणार आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी उत्तर प्रदेशच्या ११ जिल्ह्यांमध्ये सीरो सर्व्हे करण्यात आला होता. हा सर्व्हे लखनऊ, कानपूर, वाराणसी, गोरखपूर, आग्रा, प्रयागराज, गाझियाबाद, मेरठ, कौशांबी, बागपत आणि मुरादाबाद या जिल्ह्यांत करण्यात आला होता. यावेळी २२.१ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी आढळून आल्या होत्या.

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagannath Rathyatra : पुण्यात रविवारी भगवान जगन्नाथ रथयात्रा; मध्यभागात दुपारी एकपासून वाहतूक मार्गात बदल

Video: स्कूल व्हॅनला ट्रेनची जोराची धडक, ३ विद्यार्थ्यांसह ५ जणांचा मृत्यू; रेल्वे क्रॉसिंग ओलांडतांना दुर्दैवी अपघात

NEET-UG मध्ये 670 गुण; अतुल्या डोंगरेची AIR मध्ये 498 वी रँक

Matheran Mini Train : माथेरानची 'राणी' हायड्रोजन इंजिनवर धावणार!

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

SCROLL FOR NEXT