‘सेंट्रल व्हिस्टा’ सुपरफास्ट; पण त्या मशिदींचे काय? - वक्फ बोर्ड sakal
देश

‘सेंट्रल व्हिस्टा’ सुपरफास्ट; पण त्या मशिदींचे काय? - वक्फ बोर्ड

राजधानीत चर्चा; मशिदी वाचविण्यासाठी वक्फ बोर्डाची न्यायालयात धाव

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे काम राजधानीतील राजपथ आणि परिसरात अभूतपूर्व वेगाने सुरू असताना ल्यूटियन्स दिल्लीच्या या भागातील सात ते आठ मशिदी, दर्गे आणि संसदेच्या अगदी समोरच असलेली माजी राष्ट्रपती फक्रुद्दिन अली अहमद यांची समाधी यांचे काय होणार, हा सवाल राजधानीत चर्चेचा विषय ठरत आहे. दिल्ली वक्फ मंडळाने तर या मुद्यावर उच्च न्यायालयात धाव घेत, या मशिदी पाडल्या जाण्यापासून वाचवा, अशी मागणी केली आहे.

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या कामाने चांगलाच वेग घेतला आहे. संपूर्ण राजपथावर ठिकठिकाणी कामे सुरू आहेत. राष्ट्रपती भवनाच्या मागील डलहौसी रस्त्यावरील लष्कराची कार्यालये आणि सात हजार कर्मचाऱ्यांचे स्थलांतर नुकतेच श्रीमंत माधवराव शिंदे आणि कस्तुरबा मार्गावरील नवीन बहुमजली इमारतींत करण्यात आले. या जागी आता पंतप्रधानांचे निवासस्थान होणार आहे. नवीन संसद भवन पुढील वर्षी तर, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प २०२४ च्या आत कोणत्याही स्थितीत पूर्ण करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न आहे. त्यासाठी शास्त्री भवन, उद्योग भवन, निर्माण भवन, विज्ञान भवन, पुरातत्त्व विभाग या इमारतींतील कामकाज टप्प्याटप्प्याने स्थलांतरित केले जाणार आहे. त्याची तयारीही सुरू झाली.

या प्रकल्पालाच स्थगिती देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली तरी मशिदींबाबतचा मुद्दा आता उपस्थित झाला आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प थांबविला जाऊ शकत नाही, मात्र या मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळांबाबतही सरकारच्या मनात निश्चित काही योजना असणार, असे निरीक्षण कोर्टाने नोंदविले होते.

शंभर वर्षे जुन्या मशिदी

नवीन सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या परिसरात काही मंदिरेही आहेत. मात्र प्राचीन म्हणता येतील असे एकही प्रसिद्ध मंदिर या प्रकल्पाच्या मार्गात नाही. ज्या मशिदी प्रकल्पाच्या मार्गात येत आहेत त्यातील सहा मशिदी आणि दर्गे मात्र १०० वर्षे व त्याहूनही जुने आहेत. सध्याच्या आणि नवीन संसदेच्या बरोबर समोरच माजी राष्ट्रपती फक्रुद्दिन अली अहमद यांची समाधी (मजार) आहे. त्याला जोडूनच एक जुनी मशीद आहे. त्याच्या काही पावलांवर एक प्रसिद्ध दर्गा आहे. सध्याच्या उपराष्ट्रपती निवासस्थानाचे आवार आणि कृषी भवनाच्या परिसरातही एक मशीद आहे.

प्रकल्पात येणाऱ्या प्रमुख मशिदी

जाब्ता गंज मशीद, सुनहरी बाग मशीद, जामा मशीद क्रॉस रोड, कृषी भवन मशीद,

सुनहरी बागेतील मजार, रेडक्रॉस रस्त्यावरील दर्गा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT