देश

स्मार्टफोन वापरताय तर सावधान; कारण...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सध्या भारतासह जगभरात स्मार्टफोन्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. पण आता याच स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) सावध राहण्याचा इशारा जारी केला आहे. कोरोनासंदर्भातील माहिती आणि लिंक असल्याचे सांगून अनेक स्मार्टफोनमधून सर्बेरस या ट्रोजनच्या माध्यमातून खासगी माहिती चोरली जात आहे. त्याच धर्तीवर सीबीआयकडून हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

देशभरातील राज्यांना सीबीआयकडून एकप्रकारे इशाराच जारी करण्यात आला आहे. यामध्ये सीबीआयने राज्यातील पोलिस खात्यांनी आणि सुरक्षा यंत्रणांनी एका मालवेअरवर लक्ष ठेवण्याची गरज आहे, असे सांगितले. इंटरपोलच्या माहितीच्या आधारे सीबीआयने हा इशारा जारी केला आहे. फिशिंग प्रकारच्या या सायबर हल्ल्याच्या माध्यमातून आर्थिक लूट केली जाते, असे यामध्ये सांगण्यात आले आहे. याशिवाय कोरोनासंदर्भातील माहिती आणि लिंक असल्याचे सांगून अनेक स्मार्टफोनमधून सर्बेरसच्या माध्यमातून खासगी माहिती चोरली जात आहे.

स्मार्टफोन युजरला पाठवला जातो एसएमएस

कोरोनाबाबत अधिकाधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता स्मार्टफोन युजरमध्ये असल्याचे गेल्या अनेक दिवसांमध्ये स्पष्ट झाले आहे. त्यानुसार स्मार्टफोनच्या माध्यमातून ही माहिती चोरण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. स्मार्टफोन युजरला सर्बेरसच्या माध्यमातून कोरोनाबाबत काही एसएमएस पाठवले जातात. त्यावर क्लिक केल्यास ट्रोजन स्मार्टफोनमध्ये येतो आणि आपला डाटा चोरला जाऊ शकतो.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डेबिट/क्रेडिट कार्ड डिटेल्स चोरण्याचे काम

स्मार्टफोन युजर्सच्या डेबिट/क्रेडिट कार्ड डिटेल्ससह इतर आर्थिक व्यवहारासंदर्भातील महत्वाची माहिती चोरण्याचे काम या ट्रोजनच्या माध्यमातून केले जाते. मात्र, हे केले जात असताना युजरला याची कोणतीही कल्पनाही येत नाही, असे सांगण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lung Surgery In Kolhapur : भूल न देता फुफ्फुसाची अत्यंत अवघड शस्त्रक्रिया सीपीआरमध्ये यशस्वी, देशात पहिल्यांदाच श्वासनलिका जोडल्याची माहिती

Mumbai Local: मुंबई लोकलचा ताण कमी होणार! दादर ते जेएनपीटी थेट मार्ग तयार होणार; तारीख आली समोर

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये मंत्री उदय सामंत यांच्या बॅगची निवडणूक आयोगाकडून तपासणी

Ankita Bhandari Murder Case: 'अंकिता भंडारी हत्या प्रकरणात पुरावे असतील तर समोर या!' मुख्यमंत्र्यांचे आदेश, व्हायरल ऑडिओ क्लिप्सची होणार चौकशी

MMC Budget 2026 : पालिकेच्या ७४ हजार कोटींच्या अर्थसंकल्‍पावर सर्वांचे लक्ष; मुंबई जिंकण्यासाठी लढाई तीव्र

SCROLL FOR NEXT