Chandigarh man pays ₹15 lakh for number plate of scooty
Chandigarh man pays ₹15 lakh for number plate of scooty sakal
देश

71 हजारांच्या स्कूटीसाठी चक्क 15 लाखांची नंबर प्लेट केली खरेदी

सकाळ डिजिटल टीम

छंद अशी गोष्ट आहे जी माणसाला काहीही करण्यास भाद पाडते याचे एक ताजे उदाहरण म्हणजे एका व्यक्तीने 71 हजारांची स्कूटी खरेदी केली आहे. ही तर साधारण गोष्ट आहे.अशी स्कूटी कोणीही खरेदी करू शकतो पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने त्याच्या या स्कूटीसाठी 15 लाख रुपयांची नंबर प्लेट खरेदी केली आहे. हे एकूण तुम्हाला धक्का बसेल पण हे तितकेच खरं आहे. (Chandigarh man pays ₹15 lakh for number plate of scooty)

चंदीगड येथे राहणाऱ्या बृजमोहन नावाच्या 42 वर्षीय व्यक्तीने काही दिवसांपूर्वी होंडा ॲक्टिव्हा स्कूटी खरेदी केली होती. या स्कूटीची किंमत 71 हजार रुपये आहे. आता आश्चर्याची बाब म्हणजे हजारोच्या या स्कूटीसाठी त्यांनी 15 लाखांहून अधिक रुपयांची नंबर प्लेट खरेदी केली आहे त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरलाय.

बृजमोहनने सांगितले की, त्याने आपल्या मुलाच्या सांगण्यावरून ही 15.4 लाखांची महागडी नंबर प्लेट खरेदी केली आहे. लाखोंमध्ये विकल्या जाणाऱ्या या वाहनाचा VIP क्रमांक CH01-CJ-0001 आहे. बृजमोहन सांगतात की आणखी दुसरे वाहन घेणार असून हा महागडा क्रमांक त्याच वाहनासाठी वापरला जाणार.

14 ते 16 एप्रिल दरम्यान या नंबरचा लिलाव करण्यात आला आणि या कालावधीत बृजमोहनने हा VIP नंबर खरेदी केलाय. या लिलावात एकूण 378 जणांची बोली लागली होती. या लिलावात ब्रिजमोहनची बोली सर्वात वरची होती. सर्वाधिक किंमत मोजून त्यांनी ही नंबर प्लेट खरेदी केली होती.या नंबरची सुरुवातीची बोली 50 हजार होती पण बोली 15.4 लाख रुपयांपर्यंत गेली आणि ब्रिजमोहनने ती खरेदी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: कर्नाटकात 28 जागांपैकी आम्ही 25 जागा जिंकणार- बीएस येडियुरप्पा

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

SCROLL FOR NEXT