High Court News esakal
देश

High Court News: पत्नी व्यभिचारी असेल तर पोटगीवर हक्क नसेल; उच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण

पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयातलं नेमकं 'ते' प्रकरण काय?

सकाळ डिजिटल टीम

चंदीगडः घटस्फोटाच्या निर्णयासंबंधी अपिल फेटाळून लावत पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे. पत्नी जर व्यभिचारी असेल तर तिला पोटगी मागण्याचा अधिकार नसेल, असं म्हणत कोर्टाने कौटुंबिक कोर्टाचा निर्णय कायम ठेवला.

हरियाणाच्या अंबाला फॅमिली कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात एका महिलेने पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात अपिल केलं होतं. घटस्फोटासंबंधी ही याचिका होता. तिच्या पतीने सुनावणीदरम्यान पत्नीकडून अत्याचार होत असून तिच्या शिव्या खाव्या लागत असल्याचं सांगितलं होतं.

त्याशिवाय पतीने पत्नीवर गंभीर आरोप करत अंबाला जेलमध्ये असलेल्या उप अधीक्षकासोबत तिचे संबंध असल्याचं कोर्टाला सांगितलं होतं. त्यामुळे डीपीसीपींनी आपल्या तपासात ही व्यभिचाराची केस असल्याचं स्पष्ट केलंं. अंबाला कोर्टाने घटस्फोटाचं प्रकरण मंजूर केलं होतं. सदर महिलेने आपल्याला पतीकडून पोटगी मिळावी, अशी मागणी केली होती.

महिलेने पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात अपिल केलं. उच्च न्यायालयाने खालच्या कोर्टाचा निर्णय कायम ठेवत व्यभिचारी पत्नीला पोटगीचा अधिकार नसल्याचं अधोरेखित केलं आहे. न्यायालयाने पोलिसांनी केलेल्या तपासाचा हवाला देत व्यभिचारावराची टिपण्णी केली आणि पोटगीची मागणी फेटाळून लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT