Chandrayaan-3 update eSakal
देश

Chandrayaan 3 Update : 'चांद्रयान ३'चं सर्वात मोठं यश! चंद्रावर मिळाली ऑक्सिजनसह अनेक मूलद्रव्ये; हायड्रोजनचा शोध सुरु

ISRO Moon Mission : चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारा भारत पहिलाच देश आहे.

Sandip Kapde

Chandrayaan-3: चांद्रयान-३ रोव्हर ऑनबोर्ड लेझर-इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोपी (LIBS) उपकरणाने दक्षिण ध्रुवाजवळ चंद्राच्या पृष्ठभागाच्या मूलभूत रचनेवर प्रथमच इन-सीटू मोजमाप केले आहे. यामध्ये सल्फर (एस) च्या उपस्थितीची पुष्टी केली. ऑर्बिटर्सवरील उपकरणांद्वारे शोध लावणे सोपं नव्हतं पण हे साध्य झालं.

लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोपी (LIBS) हे एक जलद रासायनिक विश्लेषण तंत्रज्ञान आहे जे नमुन्यावर सूक्ष्म-प्लाझ्मा तयार करण्यासाठी लहान लेसर पल्स वापरते. याद्वारे मुलद्रव्यांचा शोध लावण्यात आला आहे.

LIBS पेलोड इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टम्स (LEOS)/ ISRO, बेंगळुरूच्या प्रयोगशाळेत विकसित केले आहे.

ISRO ने दाखवल्याप्रमाणे ग्राफिक पद्धतीने माहिती दिली आहे. यामध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर अल्युमिनियम (Al), सल्फर (S), कॅल्शियम (Ca), लोह (Fe), क्रोमियम (Cr) आणि टायटॅनियम (Ti) ची उपस्थिती दर्शवली आहे.

LIBS ने मॅंगनीज (Mn), सिलिकॉन (Si) आणि ऑक्सिजन (O) ची उपस्थिती उघड केली आहे. हायड्रोजनच्या अस्तित्वाबाबत अजून शोध सुरु आहे.

भारतीय अंतराळ संस्थेने प्रज्ञान रोव्हर चंद्राची अधिक रहस्ये उलगडण्याच्या मार्गावर, असल्याचे सांगितल्यानंतर या घडामोडी घडल्या आहेत. 23 ऑगस्ट रोजी चंद्रयान 3 चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर काही तासांनी रोव्हरला 'विक्रम' लँडरमधून बाहेर काढण्यात आले होते. (latest marathi news)

काल प्रग्यान रोव्हर चार मीटर व्यासाचा खड्डा ओलांडून आला. खड्डा मध्ये आल्यानंतर रोव्हरला मागे घेण्यास सांगितले होते. तो आता सुरक्षितपणे एका नवीन मार्गावर चालले आहे,” इस्रोने म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bapu Pathare: १०० लोक जमा केले अन्...; बापू पठारेंना मारहाण का झाली? पत्रकार परिषदेत आमदारांनी संपूर्ण विषयच उलगडून सांगितला!

दिवाळीत Invitation Cards बनवायचयं? तर Google Geminiचे 'हे' प्रॉम्प्ट वापरा

World Cup 2025: भारताने जिंकलेला टॉस? पण पाकिस्तानी कर्णधार राहिली चूप; IND vs PAK सामन्यापूर्वीच वादग्रस्त घटना; Video

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: विजेच्या धक्क्याने मुलगा जखमी

SCROLL FOR NEXT