Charanjit Singh Channi,Navjot Singh Sidhu Esakal
देश

'मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नाही तर...' CM चन्नी यांचा इशारा

दोन प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत होणार वाढ

सकाळ डिजिटल टीम

चंदीगड: काँग्रेस हायकमांडच्या सर्व प्रयत्नांनंतरही पंजाबमधील अंतर्गत कलह शांत होण्याचे नाव घेत नाही. यामुळे पंजाबची सत्ता पुन्हा काबीज करण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पंजाब विधानसभा निवडणूक 2022 च्या (Punjab Assembly Election 2022) आधी काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत अद्याप कोणताही निर्णय दिलेला नसला तरी, पंजाबचे दोन महत्त्वाचे चेहरे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) आणि पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग ही नावे पुढे आहेत. नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu)मुख्यमंत्री कोण असेल याबबत वक्तव्य करत आहेत. आम आदमी पार्टी (AAP), युती आणि अकाली दल-बसपा यांच्याकडून आधीच आव्हानांना तोंड देत असलेल्या काँग्रेससाठी दोन प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे आणखी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

पंजाबचा नवा मुख्यमंत्री कोण असेल हे पंजाबचे नागरीक ठरवतील, असे नवज्योतसिंग सिद्धू यांनी मंगळवारी सांगितले. त्याचवेळी चन्नी यांनी मुख्यमंत्र्यांच्या उमेदवाराबाबत मोठे संकेत दिले आहेत.

मुख्यमंत्री चन्नी यांना त्यांच्या पक्षाने निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचे नाव द्यावे का असे विचारले असता, चन्नी म्हणाले, काँग्रेसने निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा करावी. "जेव्हा-जेव्हा पक्षाने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केला नाही, तेव्हा-तेव्हा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे 2017 ची निवडणूक. या निवडणुकीत जेव्हा पक्षाने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला तेव्हा तो जिंकला. यापूर्वीच्या निवडणूकीत जेव्हा उमेदवार जाहीर केला नव्हता, तेव्हा ते हरले होते. असे ही ते म्हणाले.

पक्षाकडून कोणाला उमेदवारी जाहीर करायची यावर चन्नी यांनी भाष्य करण्यास नकार दिला. मंत्री चन्नी म्हणाले की, मी जिथे-जिथे जोतो तिथे लोक स्वागत करतात, हस्तांदोलन करतात. एवढेच नाही तर बॅरिकेड्स तोडून भेटण्याचाही प्रयत्न करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT