देश

चारधाम यात्रा : ‘मोक्षा’साठी यात्रेकरूंचा मृत्यू; भाजप प्रवक्तांचे विधान

सकाळ डिजिटल टीम

लोकं मोक्षाच्या इच्छेने चारधाम यात्रेला (Chardham Yatra) येतात. म्हणूनच ते आजार लपवतात आणि स्वतःला फिट सांगतात, असे भाजपचे प्रवक्ते शादाम शम्स म्हणाले. सरकारी आरोग्य सेवा सुरळीत आहे. सरकार प्रत्येक प्रवाशाच्या आरोग्याची काळजी घेत आहे. आजारी पडल्यास तत्काळ उपचार उपलब्ध करून देत आहे, असेही ते माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.

चारधाम यात्रेतील (Chardham Yatra) भाविकांच्या मृत्यूला मोक्षप्राप्तीशी जोडल्याबद्दल काँग्रेसने भाजपविरोधात आघाडी उघडली आहे. सरकारचे अपयश लपविण्यासाठी भाजप चुकीचे वक्तव्य करून संभ्रम पसरवत असल्याचा आरोप काँग्रेसने (Congress) केला. यात्रा मार्गावर आजारपणामुळे भाविकांचा मृत्यू झाला असेल; परंतु, यामुळे राज्यातील आरोग्यसेवेवर थेट प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भाजप (BJP) नेत्यांची विचार करण्याची शक्ती संपली आहे. चारधाम यात्रा मार्गावर गडबड आणि खराब आरोग्य, वाहतूक सेवांच्या सतत बातम्या येत असतात. भाजपचे नेते आपल्या सरकारचे दोष लपवण्यासाठी डोक्याशिवाय विधाने करीत आहेत, असे काँग्रेसच्या (Congress) गढवाल मंडळाच्या मीडिया प्रभारी गरिमा मेहरा दासौनी म्हणाल्या. चारधाम यात्रा २०२२ ची सुरुवात चार धामांचे दरवाजे उघडून झाली.

यात्रेत मोठ्या संख्येने प्रवासी येत आहेत. त्यांनी डॉक्टरांच्या सूचनांचे पालन केले पाहिजे. जेणेकरून त्यांचा प्रवास सुरक्षित होईल, असे केदारनाथमध्ये तैनात सिक्स सिग्माचे संचालक डॉ. प्रदीप भारद्वाज म्हणाले. हायपोथर्मियाचे आणखी रुग्ण येत आहेत. सर्दी आणि श्वासोच्छवासाच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे, असे डॉ. अनिता भारद्वाज यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मला मतदान करू नका म्हणणारे अपक्ष गोकुळ गिते आघाडीवर; शिंदेंचा उमेदवार म्हणाला, महायुतीने घात केला, सगळे गद्दार

मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची हजेरी, पुढील ३ तास अतिमुसळधार पावसाचा इशारा

India-Russia: रशियाकडून कच्च्या तेलाची विक्रमी आयात; आखाती देशातील तणावामुळे भारताची नवी रणनिती

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते आघाडीवर; शिवसेनेचे उमेदवार दराडे पिछाडीवर

Girish Mahajan : 'वडील हयात नाहीत, तिच्या लग्नाची जबाबदारी माझ्यावर'; 'त्या' वादग्रस्त फोटोबाबत मंत्री महाजनांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT