Car Gifted From Company Sakal
देश

चेन्नईमधील IT कंपनीकडून १०० कर्मचाऱ्यांना Maruti Suzuki कार भेट

कंपनीच्या वाढीसाठी आणि यशासाठी केलेल्या योगदानाबद्दल त्यांना हे बक्षिस देण्यात आलं असल्याचं सांगितलं.

सकाळ डिजिटल टीम

चैन्नई : चैन्नईमधील एका कंपनीने आपल्या जवळपास १०० कर्मचाऱ्यांना कार भेट दिली आहे. कंपनीच्या वाढीसाठी आणि यशासाठी केलेल्या योगदानाबद्दल त्यांना हे बक्षिस देण्यात आलं असल्याचं सांगितलं. Ideas2IT नावाची एक सॉफ्टवेअर कंपनी आहे जी सॉफ्टवेअर सेवा पुरवते. त्या कंपनीने आपल्या १०० कर्मचाऱ्यांना मारुती सुझुकी कार भेट दिल्या आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच चैन्नईच्या software-as-a-service company (SaaS) Kissflow या कंपनीने आपल्या पाच वरिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी सुमारे एक कोटी किमतीच्या BMW कार भेट दिल्या होत्या. त्यानंतर आता चैन्नईतीलच एका सॉफ्टवेअर कंपनीने आपल्या १०० कर्मचाऱ्यांना मारुती सुझुकी कार भेट दिल्या आहेत. या १०० कारची किंंमत सुमारे १५ कोटींच्या घरात असल्याचं सांगितलं जातंय.

"आमच्या कंपनीत सध्या ५०० कर्मचारी काम करत आहेत. त्यापैकी १० वर्षांपेक्षा जास्त काळ कंपनीसाठी काम करणाऱ्या आणि कंपनीच्या वाढीसाठी योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आम्ही ही भेट दिली आहे. कंपनीला मिळालेला नफा हा कर्मचाऱ्यांसाठी देण्याचा आमचा संकल्प आहे." असं Ideas2IT कंपनीच्या मार्केटींग प्रमुखाने सांगितलं. तसंच कंपनीचे संस्थापक अध्यक्ष मुरली विवेकानंद म्हणाले की, "आमच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीसाठी मोठं योगदान दिलं आहे.

कंपनीच्या वाढीसाठी त्यांनी काम केलं असून त्यांना हे बक्षीस कंपनी नाही तर त्यांच्या कामामुळे त्यांना हे बक्षीस मिळत आहे." असं ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, कंपनीचे ठरलेलं ध्येय पूर्ण केल्यावर आम्ही कंपनीचा नफा तुमच्यासोबत शेअर करु असं आश्वासन आम्ही कर्मचाऱ्यांना ७ ते ८ वर्षांपूर्वी दिलं होतं." असं संस्थापक अध्यक्ष विवेकानंद बोलताना म्हणाले.

"कंपनीकडून कारचं बक्षीस मिळणे आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असून कंपनी सारखंच कर्मचाऱ्यासाठी सोन्याचं नाणं, iPhones या सारखे बक्षीस देत असते. पण यावेळी बक्षीस म्हणून दिलेली कार ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे." असं कंपनीत काम करणाऱ्या आणि कार बक्षीस मिळालेल्या प्रसथ नावाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: खिशात फक्त 20 रुपये घेऊन अमेरिकेत पोहोचले, आज अब्जावधींचे मालक! भारतीय उद्योजकाचा डंका

Khambatki Ghat Tunnel Route : सातारा-पुणे महामार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा! खंबाटकी घाटात 7 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर बोगद्यातून एक लेन वाहतुकीसाठी खुली

Latest Marathi News Live Update : मुलांना इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचे व्यसन जडल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मोठा निर्णय! २९ ऑगस्टचे उपोषण अंतरवाली सराटीतच, मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

IIT Roorkee Report on Almatti Dam : सांगली-कोल्हापूर महापुराला आलमट्टीच जबाबदार! 'रुरकी आयआयटी'च्या अहवालानंतर कोर्टात जाण्याची तयारी, कर्नाटकाच्या मनमानीचा पर्दाफाश?

SCROLL FOR NEXT