Murder Sakal
देश

मारहाण करत रिक्षाचालकाचा खून; सेल्फी काढून मित्रांना पाठवला

चेन्नईतील मनालीमध्ये चार व्यक्तीने एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण करत त्याचा खून केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

चेन्नई : चेन्नईतील मनालीमध्ये चार व्यक्तीने एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण करत त्याचा खून (Murder) केला आहे. ही घटना मनालीमधील न्यू टाऊन येथे बुधवारी रात्री घडली असून खून केल्यानंतर सदर आरोपींनी मृतासोबत सेल्फी काढून त्यांच्या मित्रांना पाठवला आहे.

खून केल्यावर मृतदेहासोबत काढलेला फोटो त्यांनी आपल्या मित्रांना पाठवला होता. त्यानंतर सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यावर पोलिसांनी गुरुवारी सकाळी आरोपींना अटक केली आहे. के रविचंद्रन (३२) असं मृत व्यक्तीचं नाव असून मदन कुमार (३१), ए धनुष (१९), के जयप्रकाश (१८) आणि एस भारत (१९) या चौघांना पोलिसांनी अटक करत त्यांना कोठडीत रवाना केलं आहे.

काही दिवसांपूर्वी आरोपी मदन याने रविचंद्रनसोबत भांडण केलं होतं. त्यानंतर बुधवारी त्याने रविचंद्रनला मनालीतील न्यू टाऊन येथील मैदानावर दारू पार्टीसाठी बोलावलं आणि झालेल्या भांडणाचा वाद मिटवण्यासाठी सांगितलं होतं असं पोलिसांनी सांगितलं. काही काळानंतर त्याच्या नातेवाईकांनी रविचंद्रनला संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फोन बंद झाला होता.

पत्नी किर्थाना आणि नातेवाईकांनी त्याची शोधाशोध सुरु केली. शोधत शोधत वेत्रीनगर येथील मैदानावर पोहचल्यावर चार मित्र रविचंद्रनच्या मृतदेहासोबत फोटो काढताना नातेवाईकांना दिसले होते. घटनास्थळी नातेवाईक पोहोचल्यावर आरोपींनी पलायन केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

रविचंद्रनच्या मृतदेहावर जखमा आढळल्या असून दारूच्या बाटल्यांनी वार केल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून किर्थाना यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींना शोधण्यासाठी आणि पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलं होतं, आरोपींनी काढलेल्या सेल्फीमुळे त्यांना शोधायला मदत झाली. सदर घटनेचा पुढील तपास सुरु असल्याची माहिती अवडी पोलिस आयुक्त संदीप राय राठोड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

SCROLL FOR NEXT