Weight Loss Pills Sakal
देश

Death due to Weight Loss Pills : वजन कमी करण्याच्या गोळ्यांनी घेतला २१ वर्षीय तरुणाचा जीव

मित्रांच्या सल्ल्यावरुन त्याने ऑनलाईन गोळ्या खरेदी केल्या होत्या.

सकाळ डिजिटल टीम

चेन्नईमधल्या एका २१ वर्षीय तरुणाचा वजन कमी करण्याच्या गोळ्या खाल्ल्याने मृत्यू झाला आहे. याचं नाव सूर्या असं असून तो एका दूध कंपनीमध्ये विक्रेता म्हणून काम करतो.

सूर्याने डॉक्टरांचा सल्ला न घेता वजन कमी करण्याच्या गोळ्या घेतल्या होत्या. मात्र त्याच्या घरच्यांना या गोळ्या कोणत्या होत्या याविषयी माहिती नाही. या गोळ्यांचं प्रिस्क्रिप्शनही त्याच्याकडे आढळलं नाही. त्याच्या पालकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो गेल्या काही दिवसांपासून अशक्त आणि बारीक होऊ लागल होता.

अद्याप सूर्याच्या मृत्यूचं कारण समोर आलेलं नाही. त्याचा मृत्यू वजन कमी करण्याच्या गोळ्यांमुळे झाला की दुसरं काही कारण आहे, याचा तपास सुरू आहे. सूर्याचा मृतदेह आता शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

सूर्याला सतत वाटत होतं की त्याचं वजन जास्त आहे. त्याला त्याचे मित्रही सतत चिडवत होते. त्यामुळे तो वजन कमी करण्यासाठी डॉक्टरकडे जात होता. त्यावेळी त्याला त्याच्या मित्रांनी वजन कमी करण्याच्या गोळ्यांबद्दल ऑनलाईन माहिती घ्यायला सांगितलं. त्यामुळे त्याने खरेदी केल्या आणि खायला सुरुवात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT