Fake Alcohol esakal
देश

Delhi Police : बनावट दारूनं घेतला 80 जणांचा बळी; दारू तयार करणाऱ्या रामबाबूला दिल्लीतून अटक

बनावट दारू प्यायल्यामुळं 80 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

सकाळ डिजिटल टीम

बनावट दारू प्यायल्यामुळं 80 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

छपरामधील बनावट दारू (Fake Alcohol) प्रकरणाचा मुख्य सूत्रधार रामबाबू याला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेन अटक केलीये. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 35 वर्षीय रामबाबूच्या अटकेची माहिती बिहार पोलिसांना देण्यात आलीये.

रसायन मिसळून बनावट दारू तयार करणारा मास्टरमाईंड रामबाबू होता. या दारूकांडात 80 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. आरोपीनं त्यात रसायन मिसळून दारू तयार केली होती, त्यामुळं अनेकांना जीव गमवावा लागला होता.

80 हून अधिक लोकांचा मृत्यू

छपरामध्ये बनावट दारूमुळं 80 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनानं पाटणा ते सारण-छपरापर्यंत व्यापक छापे टाकले होते. बिहारमध्ये (Bihar) अवैध दारूच्या गाड्या फोडण्यात आल्या. अवैधरित्या तयार केलेली हजारो लिटर दारू सांडली. छपराच्या आजूबाजूला गंगेच्या काठावर बेकायदेशीर दारू भट्टी उद्ध्वस्त करण्यात आली. या घटनेची देशभरात चर्चा होती की, बिहारमध्ये दारूबंदी कायदा लागू झाल्यानंतर एवढी मोठी घटना कशी घडते. खुद्द राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानंही या प्रकरणाची दखल घेतली होती. बिहारमध्येही राजकारण तापलं होतं. भाजपनं मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या राजीनाम्याची मागणीही केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT