Chhattisgarh Accident News Esakal
देश

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Chhattisgarh Accident News: छत्तीसगडमधील बेमेटारा येथे भीषण अपघात झाला असून त्यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशातच छत्तीसगडमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. छत्तीसगडमधील बेमेटारा येथे भीषण अपघात झाला असून त्यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातात 23 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींपैकी ४ जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना रायपूर येथील एम्स रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.

जखमींपैकी ४ जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर रायपूर येथील एम्स रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. उर्वरित जखमींवर जिल्हा रुग्णालय, बेमतारा आणि सिमगा येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

बेमेत्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काठिया पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला आहे. रस्त्याच्या कडेला एक माझदा कार उभी होती, तिला एका पिकअपने धडक दिली. एका कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्व लोक तिरैया गावातून त्यांच्या पाथरा गावात परतत होते. त्यावेळी हा भीषण अपघात झाला. सध्या घटनास्थळी जिल्हाधिकारी एसपी आणि एसडीएम प्रशासन उपस्थित आहेत.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, रविवारी रात्री उशिरा काथिया गावाजवळ हा अपघात झाला हे सर्व प्रवाशी एका कार्यक्रमात सहभागी होऊन परतत होते. अपघाततील सर्वजण मूळचे पाथरा गावचे रहिवासी आहेत. ते तिरय्या गावात एका कार्यक्रमात सहभागी होऊन घरी परतत होते. त्यावेळी हा अपघात झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Magdum Death : लेकीच्या जन्माचा आनंद क्षणात विरला! आठ महिन्यांच्या गर्भवतीचा प्रसूतीवेळी अतिरक्तस्रावामुळे दुर्दैवी मृत्यू, मगदूम कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

Rising Star Asia Cup: रिंकू सिंग भारतीय संघाचा उपकर्णधार! पाटीदारची अचानक माघार, सध्या निवड न करण्याची BCCI कडे विनंती

Pimpri Chinchwad crime : सिमकार्ड, सीसीटीव्ही अन् तांत्रिक विश्लेषणातून खुनाचा उलगडा; पिंपळे गुरव प्रकरणातील आरोपीला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी

Pune Crime: लोणी काळभोरमध्ये खळबळ! खोकलाई चौकातून घरी निघालेली २७ वर्षीय विवाहिता बेपत्ता; अपहरणाचा संशय

Latest Marathi News Live Update: : जलजीवन मिशनची अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करणार; ७५ टक्क्यांहून अधिक काम झालेल्या प्रकल्पांना तातडीने निधी मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

SCROLL FOR NEXT