Chhattisgarh Assembly Election 2023 Results Sakal
देश

Chhattisgarh Assembly Election: काँग्रेसला मोठा धक्का! उपमुख्यमंत्री टीएस सिंह देव यांचा पराभव

Chhattisgarh Assembly Election 2023 Results: भाजपचे उमेदवार राजेश अग्रवाल यांनी त्यांचा पराभव केला आहे.

राहुल शेळके

Chhattisgarh Assembly Election 2023 Results: उपमुख्यमंत्री टीएस सिंगदेव यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे. ते अंबिकापूर जागेवर काँग्रेसचे उमेदवार होते. निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेश अग्रवाल यांनी त्यांचा पराभव केला आहे.

अंबिकापूर 2008 पासून काँग्रेसचा बालेकिल्ला

टीएस सिंहदेव यांच्या राजकीय प्रवासाबद्दल बोलायचे झाले तर ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे मानले जात होते. टीएस सिंहदेव हे छत्तीसगडमध्ये 'बाबा' म्हणून प्रसिद्ध आहेत. अंबिकापूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता.

2003 च्या विधानसभा निवडणुका वगळता ही जागा नेहमीच काँग्रेसच्या ताब्यात राहिली आहे. 2003 मध्ये, भाजपचे कमल भान सिंह यांनी अंबिकापूरच्या जागेवर कमळ लावले होते.

राजेश अग्रवाल यांनी 2018 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. राजेश अग्रवाल हे टीएस सिंहदेव यांच्या जवळचे मानले जातात. त्याचवेळी उमेदवारी अर्ज भरताना दोघांची भेट झाली होती. राजेश अग्रवाल यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले होते. राजेश अग्रवाल हे लखनपूर नगरपंचायतीचे अध्यक्ष आहेत.

टीएस सिंह देव हे सुरगुजाचे महाराज आहेत. ते सुरगुजा राजघराण्यातील आहे. या राजघराण्याच्या अनेक पिढ्यांचा काँग्रेसशी संबंध राहिला आहे. त्यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1952 रोजी प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे झाला.

त्यांच्या वडिलांचे नाव मदनेश्वर शरण सिंग देव तर आईचे नाव देवेंद्रकुमारी सिंग देव आहे. टीएस सिंग देव यांनी भोपाळच्या हमीदिया कॉलेजमधून एमए इतिहासाचे शिक्षण घेतले. 2013 च्या विधानसभा निवडणुकीत ते सर्वात श्रीमंत उमेदवार होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT