CM Bhupesh Baghel Team eSakal
देश

Video: छत्तीसगडच्या भल्यासाठी CM बघेल यांनी खाल्ले चाबकाचे फटके

छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील हा व्हीडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

सुधीर काकडे

देशात सध्या सर्वत्र दिवाळी साजरी केली जात असून, कोरोनाच्या सावटानंतर पहिल्यांदाच हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. दिवाळी हा देशातील सर्वात मोठा सण मानला जातो. फटाक्यांची आतिषबाजी आणि दिव्यांच्या प्रकाशात सारा देश न्हाऊन निघाला होता. त्यातच आज छत्तीसगडचे (Chhattisgarh) मुख्यमंत्री भूपेश बघेल (CM Bhupesh Baghel) यांचा एक व्हीडिओ समोर आला असून, त्यामध्ये त्यांना चाबकाचे फटके मारले जात असल्याचे दिसते आहे.

देशात अनेक ठिकाणी दिवाळीच्या वेगवेगळ्या मुहूर्तांवर विविध प्रथा परंपरांनुसार धार्मिक विधी केले जातात. असाच काहीसा एक विधी छत्तीसगडमध्ये साजरा केला गेला. त्यानुसार भुपेश बघेल यांच्या हातावर चाबकाचे फटके मारण्यात आले. हा व्हीडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. मुख्यमंत्री भूपेश बघेल हे दिवाळीनंतर साजरा केल्या जाणाऱ्या गोवर्धन पूजेत सहभागी झाले होते. यावेळी गौरा-गौरी उत्सवात सहभागी झालेल्या मुख्यमंत्र्यांना गवतापासून बनवलेल्या चाबकाचे फटके मारण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेसाठी प्रार्थना केली.

दरम्यान, दरवर्षी परंपरेनुसार मुख्यमंत्री बघेल दरवर्षी राज्याच्या कल्याणाची प्रार्थना करत या कार्यक्रमात सहभागी होतात अशी माहिती राज्याच्या जनसंपर्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दुर्ग जिल्ह्यातील जंजगिरी गावात त्यांनी ही परंपरा पाळली जाते. त्यानुसार आजच्या या कार्यक्रमात ग्रामस्थ बिरेंद्र ठाकूर यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या हातावर हे चाबकाचे फटके मारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kokilaben Ambani Hospitalised : कोकिळाबेन अंबानी यांची अचानक तब्येत बिघडली, एच एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल

Maharashtra Latest News Live Update : व्हिडिओ माझाच पण त्यातील आवाज माझा नाही, लक्ष्मण हाके

Solapur Bailpola:'अकोलेकाटीत वीस वर्षांपूर्वी प्रत्येकाच्या दारात होती बैलजोडी'; आज बोटावर मोजण्याइतक्याच; ट्रॅक्टरने बळकावली बैलांची जागा

South America Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने दक्षिण अमेरिका हादरली ! 8.0 इतकी तीव्रता, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Nations Cup 2025: नेशन्स करंडक स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल संघाचे शिबिर सुरू; सहा दिवसांनंतरही ३५ पैकी २५ खेळाडूंचीच उपस्थिती

SCROLL FOR NEXT