narendra modi amit shah ाेोकोत
देश

पंचांग पाहूनच भाजप उमेदवारांची निवड? यूपीचे ज्योतिषी छत्तीसगडमध्ये मांडणार गृह-नक्षत्राचा खेळ!

कार्तिक पुजारी

Chhattisgarh bjp candidate list 2023

नवी दिल्ली- लोकसभेच्या निवडणुका आठ महिन्यांवर येऊन ठेपल्यात. तसेच छत्तीसगड-मध्यप्रदेशमधील निवडणुका काही महिन्यांमध्ये होणार आहेत. या राज्यात भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. उमेदवारांची निवड करताना पक्षाकडून अनेक गोष्टींचा विचार केला जातो. उमेदवाराचा जनसंपर्क, त्याची निवडून येण्याची शक्यता, संघटन कौशल्य अशा अनेक पाहिल्या जातात. एका वृत्तपत्राच्या दाव्यानुसार उमेदवारांचे जिंकून येण्याचे भाग्य ज्योतिषांकडून भाजप पाहत आहे.

कोणताही पक्ष निवडून येऊ शकणाऱ्या उमेदवारावरच विश्वास टाकत असतो. जातीय समीकरण, आर्थिक-सामाजिक स्थिती, वरिष्ठ नेत्यांशी संबंध अशा गोष्टी पाहून उमेदवार निवडणुकीसाठी उभा केला जातो. अनेकवेळा सर्व प्रयत्न करुनही उमेदवाराचा पराभव होतो. तेव्हा उमेदवाराचे नशिबचे खराब होते असं म्हटलं जातं. पण, उमेदवारांना आपल्या नशीबाला नाव ठेवता येऊ नये, असा तोडगा भाजपकडून काढण्यात आल्याची चर्चा आहे.

उमेदवाराचं नशीब काय सांगते? त्याचा निवडणुकीत जिंकून येण्याचा योग आहे का? हे सर्व ज्योतिषांकडून पाहिलं जात आहे. उमेदवाराला तिकीट देण्याआधी त्याचे पंचाग पाहिले जाणार आहे. त्यामुळे उमेदवाराला आपल्या नशीबाला दोष देता येणार आहे. छत्तीसगडमध्ये भाजप याच पद्धतीचा वापर करत असल्याची माहिती 'पत्रिका' या वृत्तपत्राने भाजपमधील सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

यूपीचे ज्योतिषी

भाजपमधील सूत्रांच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये हाच प्रयोग यशस्वी झाला होता. तोच प्रयोग आता छत्तीसगडमध्ये केला जाणार आहे. पक्षाकडून तीन उमेदवारांचे नाव ठरवण्यात आल्यानंतर या उमेदवारांचे गृह-नक्षत्र पाहिले जातील. ज्याचा जिंकण्याचा योग जास्त असेल त्याला तिकीट दिले जाईल. पंचांग पाहण्यासाठी उत्तर प्रदेशमधून छत्तीसगडमध्ये ज्योतिषी आणण्यात आलेत असं सांगितलं जातंय.

भाजपची प्रतिक्रिया

माहितीनुसार, राज्यातील नेत्यांनी ५६ उमेदवारांची दुसरी यादी दिल्लीला पाठवली आहे. त्यातील ३० उमेदवारांची निवड केली जाणार आहे. तथापि, भाजप प्रदेशाध्यक्ष अरुण साव यांनी या वृत्ताला फेटाळले आहे. गृह-नक्षत्र असं काही पाहिलं जात नाहीये. लोकांमधून उमेदवारांची माहिती घेतली जाते. त्यानंतर उमेदवार ठरवला जात आहे, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! 'त्या' नागरिकांना परदेशी घोषित करण्याच्या आदेशाला स्थगिती

US Iran War: 'अचानक मृत्यूसाठी तयार राहा...'; लिंडसे ग्रॅहम यांच्या निधनानंतर इराणचा ट्रम्प यांना इशारा, आंतरराष्ट्रीय राजकारण तापलं

INDW vs ENGW TEST: चक दे इंडिया! भारतीय मुलींचा 'Lords' वर ऐतिहासिक विजय! कसोटीतील इंग्लंडची सर्वात मोठी हार...

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी सर्व आठ आरोपींची न्यायालयीन कोठडी आणखी १४ दिवसांनी वाढवली

Bloating Hidden Health Conditions: दूध-ग्लूटेन बंद करूनही पोट फुगतंय? डॉ. सेठी सांगतात, 'हे' ४ आजार असू शकतात कारणीभूत

SCROLL FOR NEXT