Chhattisgarh Election Results 2023 Arun Sao leader becomes BJP's kingmaker in Chhattisgarh  Sakal
देश

Chhattisgarh: माजी मुख्यमंत्री नाही तर छत्तीसगडमध्ये 'हा' नेता ठरला भाजपचा किंगमेकर, 'ती' खेळी ठरली यशस्वी

Chhattisgarh Election Results 2023: छत्तीसगड विधानसभेत भारतीय जनता पक्षाने पाच वर्षांच्या खंडानंतर पुन्हा सत्ताप्राप्ती केली.

सकाळ वृृत्तसेवा

Chhattisgarh Election Results 2023: छत्तीसगड विधानसभेत भारतीय जनता पक्षाने पाच वर्षांच्या खंडानंतर पुन्हा सत्ताप्राप्ती केली. निवडणुकीला सामोरे जाताना पक्षाने कोणाचाही चेहरा पुढे केला नव्हता. मात्र, पक्षाला सत्ता मिळवून देण्यात अनेकांचे योगदान राहिले. यामध्ये छत्तीसगड प्रदेश भाजपचे अध्यक्ष अरुण साव यांचे योगदान मोलाचे होते.

साव हे मागील लोकसभा निवडणुकीत ते बिलासपूर मतदारसंघातून निवडून आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी आघाडी असणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) कार्यकर्ते म्हणून साव यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आहे. साव यांनी यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष, प्रदेश सहमंत्री आणि ‘अभाविप’चे राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे.

साव हे ओबीसी समाजातील असून, खासदार असतानाही त्यांना पक्षाकडून विधानसभेच्या आखाड्यात उतरविण्यात आले होते. येथील लोरमी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी दणदणीत मताधिक्याने विजय मिळवला आहे.

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर साव यांनी राज्यभर संघटन वाढविण्यावर भर दिला. यामध्ये केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राज्यात साव यांच्या नेतृत्वाखाली महाअभियान राबविण्यात आले होते. विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी हे अभियान राबविण्यात आले होते.

या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील लोकसभेच्या ११ आणि विधानसभेच्या ९० जागांवर नियोजनबद्धरीत्या नागरिकांशी संपर्क साधण्यात आला होता. यामध्ये पक्षाकडून विविध कारवायांमध्ये हुतात्मा झालेल्यांचे कुटुंबीय, खेळाडू, कलाकार, उद्योगपती आणि समाजातील प्रभावशाली व्यक्ती यांची भेट घेण्यात आली होती.

तसेच, प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांत सभा, समाजमाध्यमांवरील प्रभावी व्यक्ती, प्रमुख कार्यकर्त्यांचे केंद्रीय मंत्र्यांबरोबर भोजन आणि चर्चा, व्यापारी मेळावा, केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा मेळावा, नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचण्याचे अभियान आदी उपक्रम राबविण्यात आले होते.

यात साव यांनी प्रचंड मेहनत घेत प्रमुख भूमिका पार पाडली होती. साव यांच्याबरोबरच भारतीय प्रशासकीय सेवेतून राजीनामा देऊन राज्याच्या निवडणूक आखाड्यात उतरलेले ओ. पी. चौधरी आणि अन्य काही नेत्यांनीही पक्षात सत्ता मिळवून देण्यासाठी मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT