Chhattisgarh Exit Poll 
देश

Chhattisgarh Exit Poll: ना महागाई ना बेरोजगारी; एक्झिट पोलनुसार, 'या' मुद्द्यावरुन झालं मतदान

छत्तीसगडमधील एक्झिट पोलचे अंदाज समोर आले असून यात काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेत येताना दिसत आहे

कार्तिक पुजारी

Chhattisgarh Exit Poll 2023- छत्तीसगडमधील एक्झिट पोलचे अंदाज समोर आले असून यात काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेत येताना दिसत आहे. India Today Axis My India च्या सर्व्हेनुसार भूपेश बघेल यांचेच सरकार पुन्हा राज्यात येईल. मुख्यमंत्री म्हणून भूपेश बघेल यांनाच लोकांनी पसंदी दिल्याचं चित्र आहे. (Chhattisgarh Exit Poll 2023 reselt who will win election cm bhupesh baghel congress or bjp party)

छत्तीसगडमध्ये करण्यात आलेल्या या सर्व्हेमध्ये 16,270 लोकांचा समावेश करण्यात आला होता. यात ७७ टक्के ग्रामिण भागातील तर २३ टक्के शहरी भागातील मतदार होते. यात ५६ टक्के पुरुष तर ४४ टक्के महिलांचा समावेश होता. लोकांनी या निवडणुकीमध्ये महागाई, बेरोजगारी किंवा आश्वासनांची घोषणा या मुद्द्यावरुन मतदान केलं नाही. तर, आपल्या आवडच्या पक्षाला मतदारांनी मतदान केलं आहे.

छत्तीसगडच्या लोकांनी कोणत्या मुद्द्यावर मतदान केलं

१. आवडता पक्ष - २० टक्के

२. आवडता उमेदवार- १० टक्के

३.राज्याच्या विकासासाठी - १० टक्के

४. काँग्रेसकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि धान्य खरेदी- १० टक्के

५. सत्ताधारी सरकारचे काम- ९ टक्के

६. सत्ता बदल आवश्यक- ८ टक्के

७. पंतप्रधान मोदींचा चेहरा- ५ टक्के

८.केंद्र सरकारचे काम- ४ टक्के

९. मुख्यमंत्री उमेदवार- ३ टक्के

१०. मागच्या भाजप सरकारच्या कामामुळे -२ टक्के

११. राज्य सरकारच्या योजनेचा लाभ मिळाल्याने- २ टक्के

१२. काँग्रेसच्या आश्वासनांमुळे-२ टक्के

१३. केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभामुळे- २ टक्के

१४. भाजपच्या आश्वासनांमुळे- २ टक्के

१५- आरक्षणाच्या मुद्द्यावरुन- २ टक्के

१६.प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमुळे- १ टक्के

१७. महागाईच्या मुद्द्यावर- १ टक्के

१८.बेरोजगारीचा मुद्दा- १ टक्के

१९. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यामुळे- १ टक्के

२०. इतर कारणांमुळे- ४ टक्के

दोन टप्प्यात झालं होतं मतदान

छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान झाले आहे. एकूण ९० जागेसाठी पहिल्या टप्प्यात २० तर दुसऱ्या टप्प्यात ७० जागांसाठी मतदान झाले. राज्यात ७६.३१ टक्के मतदान झाले आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जवळपास इतकेच मतदान झाले होते. सर्व्हेनुसार, पुन्हा काँग्रेस सत्तेत येईल. काँग्रेसला ४० ते ५० जागा मिळण्याची शक्यता आहे. भूपेश बघेल यांनी ७५ जागांचा दावा केलाय आहे. भाजपला ३६ ते ४६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाल समुद्रात दहशत! जीव वाचवण्यासाठी जहाजांच्या रडारवर मुस्लिम असल्याचे मेसेज; धर्म विचारुन केलं जातंय लक्ष्य

Amazon Prime Day Sale: आला रे आला अमेझॉनचा ‘प्राइम डे सेल’ आला; मध्यरात्रीच सुरू होतोय धडका, मोठी संधी चुकवू नका!

Latest Marathi News Updates: पुणे स्लीपर सेल मॉड्युल प्रकरणी अकरावी अटक

Shambhuraj Desai : मंत्री शंभुराज देसाईंचे थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाच आव्हान... म्हणाले,

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

SCROLL FOR NEXT