देश

आमची लस आमचा फोटो; मोदींचा चेहरा कशाला? ही राज्ये झाली आक्रमक

विनायक होगाडे

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाच्या संकटाने धुमाकूळ घातला आहे. (Corona Crisis) या संकटामध्ये अनेकांचे प्राण गेले असून सध्या आरोग्य यंत्रणांवर मोठा ताण आहे. कोरोनावर सध्या कोणत्याही प्रकारचं औषध उपलब्ध नसलं तरीही अनेक देशांनी लसी विकसित केल्या आहेत. देशात देखील सध्या लसीकरणास सुरुवात झाली आहे. सध्या लसींचा तुटवडा असला तरीही तुरळक प्रमाणात लसीकरण सुरु आहे. लसीकरणानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्राबद्दलचा वाद आता पुन्हा एकदा वर आला आहे. या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) फोटो छापण्यात येतो आहे. त्याबाबत विरोधी पक्ष काँग्रेसने सर्वांत आधी आक्षेप घेतला होता. आता अनेक राज्यांनी आता मोदींचा फोटो न छापण्याचा निर्णय घेतला आहे. (Chhattisgarh Jharkhand take objection to PM photo on corona vaccine certificate)

छत्तीसगड आणि झारखंडमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. या राज्यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे. मोदींचा फोटो असणारी लसीकरण प्रमाणपत्र आता देणार नसल्याचं या राज्यांनी स्पष्ट केलं आहे. छत्तीसगडमध्ये देखील काँग्रेसची सत्ता आहे. त्याठिकाणी देखील १८ ते ४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरणासाठी नोंदणी करिता वेगळं पोर्टलच सुरु करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात बोलताना छत्तीसगढचे आरोग्यमंत्री टी. एस. सिंग देव यांनी राज्यातील कोरोना लसीकरण प्रमाणपत्रांवर मुख्यमंत्रांचा फोटो छापला जाणार असल्याचं म्हटलं आहे.

'इकनॉमिक टाइम्स'शी बोलताना त्यांनी म्हटलंय की, मोदी सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा आर्थिक भार त्या त्या राज्यांवर टाकला आहे. लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यासोबत दरांसंदर्भात आम्हालाच चर्चा करावी लागणार आहे. जेव्हा आम्ही आमच्या लसी विकत घेऊन या वयोगटातील नागरिकांचं लसीकरण करणार आहोत तर आमची प्रमाणपत्रं आम्हीच का छापू नये? आम्ही विकत घेऊन दिलेल्या लसींच्या प्रमाण पत्रांवर मोदींचा फोटो कशाला छापायचा?, असा प्रश्न देव यांनी विचारला आहे. गेल्या बुधवारी झारखंड राज्यानेही कोरोना लसीकरणासंदर्भात नवी पद्धत सुरु केली आहे. १८ वर्षांवरील या लसीकरण मोहीमेच्या नोंदणी कार्डावर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा फोटो लावण्यात आला आहे. नरेंद्र मोदींचा फोटो का छापायचा या वादानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारे जर त्यांच्या पैशाने लोकांना लस देत असतील तर या लसीकरण प्रमाणपत्रांवर देखील त्या त्या मुख्यमंत्र्यांचा फोटो छापणेच जास्त योग्य ठरेल, असा युक्तीवाद करण्यात येतो आहे. १८ ते ४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो का छापायचा? असं जर असेल तर देशामध्ये कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या मृत्यूंची जबाबदारी देखील मोदींनी घेतली पाहिजे. कोरोनामुळे मरण पावलेल्या लोकांच्या मृत्यूपत्रावरही मोदींचाच फोटो छापायला पाहिजे, असं झारखंड काँग्रेसचे अध्यक्ष राकेश ठाकूर यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT