Man married with 2girls 
देश

"दोघींनाही मी आवडतो, मलाही त्या आवडतात"; पठ्ठ्याने एकाच मांडवात थाटामाटात केलं दोघींशी लग्न

सकाळवृत्तसेवा

छत्तीसगढ : आजवर तुम्ही एखाद्याने दोन लग्नं केल्याची घटना नेहमीच ऐकली असेल. मात्र, एकाच व्यक्तीने एकाच मांडवात दोन महिलांशी लग्न केल्याची घटना आपल्यासाठी निश्चितच नवीन असेल. छत्तीसगढमधून अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. जिथे एका व्यक्तीने दोन मुलींसोबत एकाच वेळी लग्न केल्याची घटना समोर आली आहे. त्याने हे लग्न काही लपून-छपून केलं नाहीये तर दिवसाढवळ्या सगळ्या गावासमोर हे लग्न पार पडले आहे. सामान्यत: याप्रकारे दोन लग्न करण्याची घटना असामान्य असते. मात्र, हे तिघांचंही लग्न तिंघांच्याही सहमतीने झाल्याची ही घटना दुर्मिळ आहे. 

हसीना आणि सुंदरी असं या दोन मुलींची नावे आहेत. या दोघींनाही नवरदेव चंदू मौर्य आवडायचा. आणि म्हणून या दोघींनी जरा समजूतदारपणा दाखवून एकाच मंडपात चंदूशी लग्न केलं. यावेळी चंदूने म्हटलं की, मला त्या दोघीही आवडतात. तसेच त्या दोघींनाही मी आवडतो. हे लग्न आम्ही गाववाल्यांच्या समोर आणि सहमतीने केलं आहे. मात्र, या लग्नात माझ्या एका पत्नीच्या घरचे सदस्य या विवाहात सामिल झाले नाहीयेत. या लग्नामधील सर्वांत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे लग्न संपूर्ण गावासमोर पार पडले तसेच कुणीही या लग्नाला विरोध दर्शवला नाही. 

हसीना ही 19 वर्षीय आहे तर सुंदरी ही 21 वर्षांची आहे. दोघींनीही 12 वीची परिक्षा दिली आहे. त्यांच्या या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. बस्तर जिल्ह्यातील हे पहिलेच उदाहरण आहे जिथे सगळ्या गाववाल्यांच्या समोर याप्रकारचे लग्न  पार पडले आहे. ते ही मोठ्या थाटामाटात. याप्रकारचा विवाह हिंदू विवाह अधिनियमांमधील एक अपराध आहे. याविरोधात अद्यापतरी कोणतीही तक्रार दाखल झाली नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT