Surrender of armed Naxalites in Kanker district

 

esakal

देश

Chhattisgarh Naxalite Surrender : छत्तीसगडमध्ये या वर्षांत तब्बल दोन हजारांहून अधिक नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण!

Surrender of armed Naxalites in Kanker district : कांकेरमध्ये १३ महिलांसह २१ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण ; मोठ्याप्रमाणात शस्त्रही केले

Mayur Ratnaparkhe

Massive Naxalite Surrender in Chhattisgarh : छ्त्तीसगडमधील कांकेर येथे रविवारी २१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. याचबरोबर छत्तीसगडमध्ये या वर्षांत आतापर्यंत आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलींची एकूण संख्या ही तब्बल २ हजार ४० वर पोहचली आहे. आज(रविवार) आत्मसमर्पण केलेल्या २१ नक्षलींमध्ये १३ महिला आणि आठ पुरूषांसमावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार हे नक्षलवादी केशकाल भागातील कुएमारी/किस्कोडो एरिया कमिटीचा भाग होते. या २१ नक्षलवाद्यांनी १८ हत्यारांसह आत्मसमर्पण करत, मुख्य प्रवाहात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. यामध्ये समितीचा सचिव मुकेशचाही समावेश आहे.

आत्मसमर्पण करणाऱ्या २१ कार्यकर्त्यांमध्ये चार डीवीसीएम, ९ एसीएम आणि आठ सदस्य्चा समावेश आहे. यावेळी तीन एके-47 रायफल, चार एसएलआर रायफल, दोन इंसास रायफल, 6 हजार 303 रायफल, दोन सिंगल शॉट रायफल आणि १ बीजएल शस्त्र देखील जमा करण्यात आले.

बस्तरचे आयजी पी. सुंदरराज यांनी सांगितले की, या वर्षी २००० हून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे. या संदर्भात, सरकार नक्षलवादाचे उच्चाटन करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. सुरक्षा दल नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात ऑपरेशन करत आहेत. त्याच वेळी, आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध सुविधा पुरवल्या जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's World Cup 2025: भारताचा बांगलादेशविरुद्ध सामना पावसामुळे रद्द! साखळी फेरी संपली पाँइट्सटेबलमध्ये कोण कोणत्या स्थानी?

Tejashwi Yadav on Waqf Act : ‘’…तर आम्ही ‘वक्फ कायदा’ कचऱ्याच्या डब्यात टाकू’’ ; तेजस्वी यादव यांचं मोठं विधान!

Mohol Politics : अखेर ठरलं! सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने यांचा बुधवारी हजारो कार्यकर्त्यासह भाजपात होणार प्रवेश

Jogendra Kawade : फलटण प्रकरणात पडद्यामागील सूत्रधारांचा पण तपास करा

World Cup 2025: टीम इंडियाला धक्का! सेमीफायनलपूर्वी प्रतिका रावल जखमी, चालू सामन्यात सोडावं लागलं मैदान; BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT