Two days leave for government employees Two days leave for government employees
देश

सरकारी कर्मचाऱ्यांना आता दोन दिवस सुटी; या राज्याने घेतला निर्णय

सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी मोठी घोषणा

सकाळ डिजिटल टीम

छत्तीसगड : सरकारी कर्मचाऱ्यांना आता महिन्यातील सर्व शनिवारी सुटी (Two days leave for government employees) मिळणार आहे. बुधवारी सामान्य प्रशासन विभागाने महानदी भवन मंत्रालयाकडून याबाबतचे आदेश जारी केले आहे. सहसचिव संजय अग्रवाल यांनी जारी केलेल्या आदेशानुसार आता कामाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५.३० अशी निश्चित केली आहे. लंच ब्रेक पूर्वीप्रमाणेच राहील. कर्मचाऱ्यांना दररोज अर्धा तास अतिरिक्त काम (Half an hour extra work) करावे लागणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर जीएडीने हा आदेश जारी केला आहे. (Two days leave for government employees)

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी बस्तरच्या जगदलपूरमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी मोठी घोषणा केली होती. पाच दिवस कामाची पद्धत लागू केल्याने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दैना उडाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आठवडाभरातच त्याची अंमलबजावणी झाली. यासंदर्भातील अधिसूचना आज जारी केली असून ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे कर्मचारी संघटनांनी स्वागत केले. यापूर्वी मंत्रालयीन कर्मचारी संघटनेसह विविध संघटनांनीही मुख्यमंत्र्यांचे आभार मानले होते. येथे रोजंदारी कामगारांना दोन दिवस सुटीमुळे आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.

मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या आदेशानुसार राज्य सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या शनिवारी सुटी देण्यात येत होती. आता शनिवार आणि रविवारीही राज्यात सरकारी सुट्टी (Two days leave for government employees) असेल. अधिसूचनेत असे म्हटले आहे की, राज्याची मंत्रालये आणि विभाग प्रमुखांची कार्यालये आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांसाठी कामाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५.३० पर्यंत (Half an hour extra work) असेल.

उत्पादकता तसेच कार्यक्षमता वाढेल

आठवड्यातील कामकाजाचे दिवस कमी करण्याबाबत सरकारचा विश्वास आहे की, यामुळे उत्पादकता वाढेल तसेच कार्यक्षमता वाढेल. आठवड्यातून दोन दिवस सुटी मिळाल्याने कर्मचाऱ्यांचा मानसिक ताणही कमी होईल आणि कामही चांगल्या पद्धतीने होईल. यापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या शनिवारी सुटी (Two days leave for government employees) देण्यात येत होती, ती आता वाढवण्यात आली आहे. यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांना दर महिन्याला आठ सुट्या नक्कीच मिळणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT