Chief Election Commissioner Sunil Arora stuck in U.S. due to travel curbs 
देश

#Lockdown2.0 : लॉकडाऊनचा मुख्य निवडणूक आयुक्तांना फटका; 'या' देशात पडले अडकून

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताचे मुख्य निवडणुक आयुक्य सुनील अरोरा यांना लॉकडाऊनचा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे ते अमेरिकेत अडकून पडले आहेत. भारतासहित अनेक देशांमध्ये १ महिन्याहून अधिक काळ लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनमुळे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा हे अमेरिकेत अडकले आहेत. ते वैयक्तिक कारणासाठी अमेरिकेत गेले होते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ते परतणार होते. पण २३ मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणावर बंदी आल्याने ते अमेरिकेतच राहीले आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

१० मार्च रोजी ते वैयक्तिक प्रवासानिमित्ताने अमेरिकेत गेले. ४ एप्रिलला ते भारतात परतणे अपेक्षित होते. परंतु लॉकडाऊन असल्याने त्यांना परतणे अशक्य झाले. मुख्य निवडणूक आयुक्त अरोरा निवडणूक आयोगाचे महत्वपूर्ण निर्णय व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेत आहेत. ते अमेरिकेतूनच महत्वपूर्ण कामं करतं असून लॉकडाऊन संपण्याची वाट पाहत आहेत. निवडणूक आयोगाचे इतर दोन सदस्य अशोक लवासा आणि सुशील चंद्र यांच्या ते सतत संपर्कात आहेत.

लॉकडाऊनचे गांभीर्य पाहता निवडणूक आयोग देखील सोबत असल्याचे सुनील अरोरा यांनी म्हटले होते. या लढाईत निवडणूक आयोगाला देखील पगार कपात करावी लागेल असे ते म्हणाले. ते आणि इतर दोन सदस्य वर्षभर पगारात ३० टक्के कपात करत असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PlayOff Scenario: सहा संघांनी खेळले ८ सामने, ४ संघांनी ७! प्ले ऑफच्या जवळ कोण अन् दूर कोण? पाहा Point Table ची स्थिती

IPL 2026 Point Table: सुनील नरीनने ३ चेंडूंत Super Over ची मॅच संपवली; कोलकाता नाइट रायडर्सचा रोमहर्षक विजय, LSG चे पॅकअप?

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Shirur Road Delivery Case: शिरूरमध्ये रस्त्यावर प्रसूतीची धक्कादायक घटना; आरोग्य विभागावर नाकर्तेपणाचे आरोप

Gangapur Shadval Baba Urus: अमळनेर वस्तीतील शादवल बाबांचा उरूस उद्या; हिंदू-मुस्लिम एकतेच्या प्रतीक उत्सवात सर्वधर्मीयांचा सहभाग

SCROLL FOR NEXT