Karnataka High Court esakal
देश

Karnataka High Court : भाजप सरकारला मोठा दणका; उच्च न्यायालयानं वोक्कालिगा-लिंगायत आरक्षणाला दिली स्थगिती!

राज्यात ओबीसींच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्थितीवर आधारित चार श्रेणी आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Karnataka High Court : लिंगायत आणि वोक्कलिगांसाठी स्वतंत्र ओबीसी प्रवर्ग निर्माण करण्याच्या आणि शिक्षण-सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला कर्नाटक उच्च न्यायालयानं स्थगिती दिलीये. न्यायालयानं सरकारला ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत यथास्थिती ठेवण्यास सांगितलंय.

सरन्यायाधीश पीबी वराळे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं कर्नाटक राज्य सरकारच्या प्रस्तावित नवीन श्रेणीला स्थगिती दिली आणि यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले. नवीन श्रेणीच्या निर्मितीला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकांची सुनावणी 30 जानेवारीपर्यंत पुढं ढकलण्यात आलीये.

बोम्मई सरकारनं जाहीर केलं होतं वेगळं आरक्षण

बेळगांव इथं नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात सरकारनं लिंगायत आणि वोक्कलिगांचा समावेश करण्यासाठी 2C आणि 2D या दोन नवीन श्रेणी तयार करण्याची घोषणा केली होती. यामध्ये लिंगायतांच्या पंचमसाली जातीला 2A श्रेणीमध्ये समाविष्ट करण्याचं ठरलं होतं.

राज्यात ओबीसींच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्थितीवर आधारित चार श्रेणी आहेत : 2A, 2B, 3A आणि 3B. या समुदायांना श्रेणीच्या आधारावर नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्राधान्य आरक्षण मिळतं. 2A हा सर्वात मागासलेला आहे, तर 2B मधला आहे आणि 3A आणि 3B त्यांच्या थोडा वर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT