Rajasthan Election Esakal
देश

Rajasthan Election: राजस्थानच्या निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एंट्री! कोणाचा करणार प्रचार

राजस्थान मध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जाणार असल्याची महिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राजस्थानच्या निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. निवडणुकीच्या अगदी अखेरच्या टप्प्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थानच्या दौऱ्यावर प्रचाराला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे हे भाजपचा प्रचार करण्यासाठी नाही तर ते शिवसेनेचा राजस्थान मधला एकमेव उमेदवार असणाऱ्या राजेंद्र गुढांचा प्रचार करण्यासाठी जाणार असल्याची माहिती आहे.

राजस्थान मध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जाणार असल्याची महिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेकडून राजस्थानमध्ये माजी मंत्री राजेंद्र गुढा हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. गुढा यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजस्थानला जाणार असल्याची माहिती मिळते. राजस्थानमध्ये बहुतांश मराठी बांधव हे व्यवसायासाठी स्थायिक झाले आहे.

तर मुंबईत व्यवसायासाठी स्थायिक झालेले व्यापारी हे मतदाना करता राजस्थानला जातात. या मतांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री राजस्थानमध्ये प्रचारासाठी जाणार असल्याची माहिती मिळते. महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय सत्तांतरानंतर मुख्यमंत्री यापूर्वी कर्नाटक निवडणुकांवेळीही प्रचाराला गेले होते. त्यानंतर राजस्थानला जात असल्याने शिवसेना आता महाराष्ट्रा बाहेरही विस्थापित करण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न सुरू आहे.

कोण आहे राजेंद्र गुढा?

राजेंद्र गुढा हे गेहलोत सरकार मधील मंत्री आहेत. 55 वर्षांचे गुढा जवळपास 2008 पासून राजस्थानच्या राजकारणात सक्रीय आहेत. आधी काँग्रेस आणि मग बहुजन समाज पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली आहे. गेल्या निवडणुकीत ते बसपाकडून निवडून आले होते. त्यानंतर ते काँग्रेस सरकारमध्ये सामिल झाले त्यांना मंत्रीपद देखील मिळाले. पण सत्तेत असतानाही अशोक गेहलोत यांचे मुख्य टिकाकार अशीच त्यांची ओळख राहिलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मराठी कलाकारांची ठाकरेंच्या मेळाव्याला मोठी हजेरी – कोण कोण आले आहे?

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT