child three legs took birth father demands help cm yogi adityanath 
देश

तीन पायांच्या बाळाला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

वृत्तसंस्था

लखनौ (उत्तर प्रदेश): गाजीपूर जिल्ह्यामध्ये तीन पायांच्या बाळाचा जन्म झाला असून, त्याला पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. अनेकांनी हा दैवी चमत्कार असल्याचे म्हटले असून, परिसरात चर्चा रंगली आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गाजीपूर जिल्ह्यातील तियरा गावात तीन पायांच्या बाळाचा जन्म झाला आहे. गावातील प्रियंका देवी यांनी 29 सप्टेंबर रोजी बाळाला जन्म दिला आहे. मुलाचा तिसरा पाय त्याच्या गुप्तांगाशी जोडला गेलेला आहे. या पायाला सहा बोटे आहेत. बाळाचे आरोग्य उत्तम असून ते सामान्य बाळासारखे आहे. तीन पायांचं बाळ हा सध्या सर्वत्र कुतुहलाचा विषय झाला असून, अनेकजण त्याच्या पाया पडण्यासाठी गर्दी करू लागले आहेत.

दरम्यान, बाळाचे वडील विवेकानंद यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. मुलावर उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. मुलाच्या उपचारासाठी त्यांनी मदतीचे आवाहन केले आहे.  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे देखील मदत मागितली आहे. सहाय्यक मुख्य वैद्यकीय अधिकारी उमेश कुमार यांनी हा विशिष्ट प्रकारचा आजार असून, या आजाराला कंजेनिटल अनोमिली असे म्हटले जाते. गरोदर महिला जर रेडिएशनच्या संपर्कात आली किंवा एखाद्या औषधाचा साइड इफेक्ट झाल्यास अशा प्रकारचे मूल जन्माला येते, असेही उमेश कुमार यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Nagpur Ganesh Visarjan: ड्रोनमधून ठेवणार गणेश विसर्जनावर नजर;६, हजार ४०० पोलिसांचा बंदोबस्त; १ हजार ७०२ सार्वजनिक गणेश मंडळांचा समावेश

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

बेलापूरमध्ये पारसिक हिलवरून थेट रुळावर कोसळली कार, १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी; हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत

SCROLL FOR NEXT