Prashant Kishor vs Tejashwi Yadav esakal
देश

Prashant Kishor : 'दहावी नापास झालेल्या नेत्यांची मुलं मुख्यमंत्री पदाची स्वप्नं पाहताहेत'

'TET आणि CTET उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांवर पोलिस लाठीचार्ज करत आहेत.'

सकाळ डिजिटल टीम

'TET आणि CTET उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांवर पोलिस लाठीचार्ज करत आहेत.'

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांनी आरोग्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे धाकटे पुत्र तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांना आपला राजकीय वारस घोषित केला आहे. यानंतर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी तेजस्वी यादव यांच्या पात्रतेवर निशाणा साधलाय.

येथील सुशिक्षित लोक रोजगारासाठी दारोदारी चकरा मारत असून, बिहारमध्ये दहावी उत्तीर्ण न झालेल्या नेत्यांची मुलं मुख्यमंत्री होण्याची स्वप्नं पाहत आहेत, असा टोला प्रशांत किशोर यांनी तेजस्वींना लगावला.

प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, 'बिहार शिक्षक पात्रता परीक्षा (TET) आणि केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांवर पोलिस लाठीचार्ज करत आहेत. त्यांना मारहाण केली जात आहे. 10 लाख सरकारी नोकऱ्यांचं खोटं आश्वासन देणारं सरकार टीईटी आणि सीटीईटी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांवर लाठीमार होताना पाहत आहे. बिहारमध्ये 10 वी उत्तीर्ण नसलेल्या राजकारण्यांची मुलं मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न पाहत आहेत आणि सामान्य कुटुंबातील लोक नोकरीसाठी दारोदार चकरा मारताना दिसत आहेत.'

'कुडणीतील पराभवाला नितीशकुमारच जबाबदार'

यापूर्वीही प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा चांगलाच समाचार घेतला होता. ते म्हणाले, 'बिहारच्या जनतेचा मुख्यमंत्र्यांवरील विश्वास इतका उडालाय की, नितीश कुमार सुरक्षा रक्षकाशिवाय कोणत्या गावातही जाऊ शकत नाहीत. कुडणी विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभव हा नितीशकुमार यांच्यावरील जनतेचा उडालेला विश्वास आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: श्वानांचा ९३ नागरिकांना चावा, विधानसभेत मुद्दा गाजला; भटक्या कुत्र्यांसाठी महायुती सरकारचा मोठा निर्णय

Sports Teacher Recruitment : क्रीडा शिक्षक भरती रखडल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात; आझाद मैदानात ८ जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन

Higher Education Protest: एम.फिल पात्र कंत्राटी प्राध्यापकांना पदोन्नतीसाठी ‘स्पुक्टो’चे उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर मंगळवारपासून बेमुदत धरणे

Solapur Health Crisis: मंगळवेढ्यात २७हून अधिक आरोग्य पदे रिक्त; भैरवनाथ उद्योग समूहाचे अनिल सावंत यांची आरोग्यमंत्र्याकडे तात्काळ भरतीची मागणी

Highway Crime : गोलटगाव फाट्यावर भरधाव वाहनासमोर उडी; २२ वर्षीय तरुणाने जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT