chin warning to india after modi visit leh 
देश

भारताला किंमत चुकवावी लागेल; मोदींच्या लेह दौऱ्यानंतर चीनचा इशारा

वृत्तसंस्था

बिजिंग- दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या कृत्रिम अडथळ्यांमुळे भारताला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. बिजिंग भारतामधील चीनचा व्यवसाय टिकवण्यासाठी योग्य ती पाउलं उचलेलं. तसेच भारत-चीन सीमा भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांनी प्रयत्न करायला हवेत, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी आज म्हटलं आहे. भारताने चिनी अॅप्सवर आणलेली बंदी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लेह भेट या पार्श्वभूमीवर चीनकडून आलेली प्रतिक्रिया महत्वाची आहे.

आणखी एका शेजाऱ्यानं भारताशी घेतला पंगा, निर्यात रोखली
भारताकडून चीन विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचं सांगत 59 चिनी अॅप्सवर बंदी आणली आहे. तसेच चिनी कंपन्यांकडून भारतात होणाऱ्या गुंतवणुकीवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. 15 जून रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे भारतात चीनविरोधात संतापाची लाट आहे. अशात भारत सरकारने चीन विरोधात कठोर पाउलं उचलण्यास सुरुवात केली आहे. 

मोदी यांनी आज लेह-लडाखला भेट देत सर्वांनात आश्चर्याचा धक्का दिला. त्यांची लेह भेट अगदी अनपेक्षित होती. मोदींनी लडाखमधील सैनिकांशी संवाद साधत त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. तसेच चीनसोबत झालेल्या संघर्षात शहीद झालेल्या 20 जवानांना श्रद्धांजली वाहिली. तसेच मोदींनी आपली भूमिका चीनसमोर ठेवली आहे. विस्तारवादाचे दिवस आता संपले आहेत, आता विकास युग सुरु झालं आहे. विस्तारवादाच्या भूमिकेमुळे नेहमीच जीवितहानी झाली आहे, असं म्हणत त्यांनी चीनला इशारा दिला आहे.

खबरदारी घ्या ! आता एका रुग्णामागे दहा जणांची विलगीकरणात रवानगी
चिनी अॅप्सच्या बंदी आणण्याच्या भारताच्या निर्णयावर चीनने टीका केली आहे. भारताने चिनी कंपन्यांच्या टिकटॉक, यूसी ब्राऊझर, कॅम स्कॅनर, शेअरईट इत्यादि लोकप्रिय अॅप्सवर बंदी आणली आहे. भारताने घेतलेला निर्णय आंतराष्ट्रीय व्यापार संघटनेने घालून दिलेल्या निकषांचे उल्लंघन करणारा आहे. याचा परिणाम दोन्ही देशांच्या संबंधावर होणार असून भारताला नुकसान सहन करावे लागू शकते, असं चीनने म्हटलं आहे. 

दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी सुरक्षा प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्या समवेत लेहला भेट दिली. मोदी सकाळी साडे नऊ वाजता लेह येथे पोहोचले होते. मोदी यांनी निमू येथील एका फॉरवर्ड पोस्टला भेट दिली. येथे त्यांनी वायुसेना, थलसेना आणि आईटीबीपीच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. निमू हे 11,000 फुट उंचीवर असून सगळ्यात दुर्गम स्थानापैकी एक मानले जाते. निमू जंस्कार पर्वत श्रृंखलांनी घेरलेलं आहे. मोदींनी भारतीय जवानांना यावेळी संबोधित केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT