China Assures India on Rare Earth Minerals Tunnel Boring Machines Supply: एकीकडे भारत आणि अमेरिकेत टॅरिफ वॉर सुरू झालेलं असताना, दुसरीकडे भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये दिवसेंदिवस सुधारणा होताना दिसत आहे. यामुळे भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये सकारात्मक बदलाचा टप्पा सुरू झाल्याचे बोलले जात आहे. कारण, आता चीनने भारताला खते, दुर्मिळ मृदा खनिजे आणि टनल बोरिंग मशीनचा पुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले आहे.
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत आणि या काळात त्यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी झालेल्या भेटीत हे आश्वासन दिले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गेल्या महिन्यात चीन दौऱ्यात परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत युरिया, एनपीके आणि डीएपी, दुर्मिळ मृदा खनिजे आणि टीबीएमच्या पुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावित चीन दौऱ्याच्या काही दिवस आधी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांचा हा दौरा होत आहे. २०२० मध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत-चीन संबंध गंभीर ताणले गेले होते. हे पाहता, चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या भेटीकडे दोन्ही शेजारी देशांनी संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पाहिले जात आहे.
तर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान एस जयशंकर म्हणाले की, भारत आणि चीनने परस्पर आदर, संवेदनशीलता आणि परस्पर हितसंबंधांवर आधारित संबंध पुढे नेण्यासाठी स्पष्ट आणि रचनात्मक दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. तसेच वांग यांच्याशी झालेल्या बैठकीत परराष्ट्रमंत्र्यांनी पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेजवळील (एलएसी) सीमावर्ती भागात तणाव कमी करण्याची प्रक्रिया पुढे नेण्यावर भर दिला. कारण, या भागात दोन्ही देशांच्या सैन्यात गेल्या चार वर्षांहून अधिक काळापासून संघर्ष सुरू आहे.
परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केले की तैवानवरील भारताच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही आणि जगाप्रमाणे भारतही आर्थिक आणि सांस्कृतिक संबंधांसाठी राजनैतिक उपस्थिती कायम ठेवेल. तर अमेरिकेच्या सध्याच्या धोरणांमुळे परस्पर संबंध अधिक दृढ करण्याची आवश्यकता आहे यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली गेली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.