Bridge sakal
देश

बळकावलेल्या भागावर चीनने बांधला पूल, फोटोमुळे ड्रॅगनचा पर्दाफाश

पूर्व लडाखमध्ये पँगाँग सरोवराच्या पलिकडे बेकायदा बळकाविलेल्या भागावर चीन पूल बांधत असल्याची माहिती केंद्र सरकारने आज संसदेत दिली.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये पँगाँग सरोवराच्या पलिकडे बेकायदा बळकाविलेल्या भागावर चीन पूल बांधत असल्याची माहिती केंद्र सरकारने आज संसदेत दिली. संबंधित भाग १९६२ पासून चीनच्या ताब्यात असून या बेकायदा ताब्याला भारताने कधीही मान्यता दिलेली नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच, भारताच्या सार्वभौमतेचा इतरांनी आदर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. (China developed Bridge At India's Land)

बळकाविलेल्या भागात चीन पूल बांधत असल्याची भारत सरकारने नोंद घेतली असल्याचे एका प्रश्‍नाला लेखी स्वरुपात उत्तर देताना सरकारने संसदेत सांगितले. ‘चीनच्या या बेकायदा ताब्याला भारताने कधीही मान्यता दिलेली नाही. जम्मू-काश्‍मीर आणि लडाख हे भारताचेच अविभाज्य भाग आहेत, हे भारताने अनेक प्रसंगी वारंवार स्पष्ट केले आहेत. इतर देशांनी भारताच्या या सार्वभौमतेचा आदर करावा, अशी आमची अपेक्षा आहे,’ असे सरकारने या लेखी उत्तरात म्हटले आहे.

चीन बांधत असलेला पूल पँगाँग सरोवरच्या उत्तर किनाऱ्यावर असून त्याची लांबी आठ मीटर आहे. याच भागात चिनी सैन्याने रुग्णालय आणि सैनिकांना राहण्यासाठी खोल्या बांधल्याचे दोन वर्षापूर्वी झालेल्या संघर्षानंतर दिसून आले होते. या संघर्षानंतर उच्चस्तरीय चर्चा होऊन शांतता निर्माण झाली आहे. मात्र, या पुलामुळे ही शांतता पुन्हा धोक्यात आली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

प्रत्यक्ष ताबा रेषेचा आदर, ‘जैसे थे’ स्थितीचा भंग केला जाऊ नये आणि दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारांचे कठोरपणे पालन व्हावे या तीन मुद्द्यांच्या आधारावरच चीनबरोबर चर्चा केली जात असल्याचे सरकारने लेखी उत्तरात म्हटले आहे. चीनने अरुणाचल प्रदेशमधील काही भागांची नावे बदलल्याच्या घटनेचीही नोंद सरकारने घेतली आहे. चीनचे हे प्रयत्न निष्फळ असून अरुणाचल प्रदेश हा भारताच अविभाज्य भाग आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT