DMK  Sakal
देश

China Flag On Indian Rocket Ad: इस्रोच्या 'त्या' जाहिरातीवर चिनी झेंडा कसा आला? तामिळनाडूच्या मंत्र्यांचं स्पष्टीकरण

भाजपनं या मुद्द्यावरुन रान उठवलं असून डीएमकेनं जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. | Know How did the Chinese flag appear on ISRO's 'that' ad? Clarification of Ministers of Tamil Nadu...

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या नव्या प्रक्षेपण परिसराशी संबंधित एका जाहिरातीत चीनचा झेंडा दाखवल्यानं तामिळनाडू सरकारवर टीकास्त्र सुरु झालं आहे. भाजपनं इथल्या डीएमके सरकारवर सडकून टीका केली असून जनतेची माफी मागण्याची मागणी केली आहे.

या पार्श्वभूमीवर आता तामिळनाडूच्या एका मंत्र्यानं यावर स्पष्टीकरण दिलं आहे. हा प्रकार म्हणजे डिझायनरची चूक होती, द्रमुकचा यामध्ये दुसरा काहीही हेतू नव्हता नव्हता असं म्हटलं आहे. आमच्या हृदयात भारतासाठी केवळ प्रेम आहे, असंही या मंत्र्यानं म्हटलं आहे. (china flag indian rocket adevertisement clarification by minister of tamilnadu govt)

वादग्रस्त जाहिरात देणारे द्रमुकचे नेते आणि मत्स्य पालन मंत्री अनिता आर. राधाकृष्णन यांनी म्हटलं की, भारत एकजूट राहिला पाहिजे. देशात जाती आणि धर्माच्या आधारे संघर्ष होता कामा नये. द्रमुकचे नेते दिवंगत एम. करुणानिधी यांनी पहिल्यांदा कुलसेकरपट्टिनम इथं इस्रोच्या एका नव्या प्रक्षेपण परिसराची मागणी केल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. (Latest Marathi News)

भाजपनं केली माफीची मागणी

भाजपचे नेते केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांनी द्रमुकच्या त्या जाहिरात प्रकाशित करण्यावरुन तामिळनाडू सरकारनं लोकांची माफी मागावी अशी मागणी केली. मुरुगन यांनी म्हटलं की, जाहिरातीत भारतीय ध्वज लावणं आपलं कर्तव्य आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

पंतप्रधान मोदींनी साधला थेट इशारा

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी कुलसेकरापट्टिनममध्ये इस्रोच्या नव्या परिसराचं भूमिपुजन केलं. याचा खर्च सुमारे ९८६ कोटी रुपये आहे. जेव्हा हा परिसर विकसित होईल तेव्हा इथून प्रत्येक वर्षी २४ प्रक्षेपणं केली जातील.

यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना मोदींनी आरोप केला होता की, द्रमुक सरकार काम करत नाही तर केवळ केंद्रीय योजनांवर आपले स्टिकर लावत आहे. यावेळी तर त्यांनी हद्दच केली ती म्हणजे इस्रोच्या परिसराचं श्रेय घेण्यासाठी तिथं चीनचा झेंड्याचं स्टिकर चिकटवलं. हा आपल्या देशाचा अपमान आहे, आपल्या देशातील अंतराळ संशोधकांचा अपमान आहे. तामिळनाडूचे लोक या कृत्यासाठी द्रमुकला शिक्षा देतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT