देश

चीनने सैन्य तैनाती वाढवताच भारताकडून K9-वज्र होवित्झर रेजिमेंट तैनात

फॉरवर्ड भागांमध्ये (Forward area) चीनने मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनाती केली असून, भारतासाठी हा चिंतेचा विषय असल्याचं लष्करप्रमुखांनी सांगितलं.

दीनानाथ परब

लडाख: "पूर्व लडाख आणि उत्तरेकडच्या सीमेवर चीनने (china) मोठ्या संख्येने आपलं सैन्य तैनातं केलं आहे" असं लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे (Manoj naravane) यांनी म्हटलं आहे. सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुखांनी पूर्व लडाखमधील (eastern ladakh) फॉरवर्ड भागांचा दौरा केला. फॉरवर्ड भागांमध्ये (Forward area) चीनने मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनाती केली असून, भारतासाठी हा चिंतेचा विषय असल्याचं लष्करप्रमुखांनी सांगितलं.

"चीनच्या सर्व हालचालींवर आमचे बारीक लक्ष आहे. त्यांचा मुकाबला करण्यासाठी त्याच तोडीचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि सैन्य तैनातीच्या दृष्टीने तयारीत आहोत" असे लष्कराने म्हटले आहे. या स्थितीत भारत कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे असे नरवणे यांनी एएनआयला सांगितले.

"मागच्या सहा महिन्यांपासून परिस्थिती सामान्य होती. ऑक्टोंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तेराव्या फेरीची चर्चा होणार आहे. त्यावेळी तणावावर तोडगा दृष्टीपथात येईल" अशी अपेक्षा नरवणे यांनी व्यक्त केली. "मतभेदांवर चर्चेतून मार्ग काढावा असे माझे ठाम मत आहे. आम्ही यातून काहीतरी तोडगा काढू" अशी अपेक्षा आहे असे नरवणे म्हणाले.

पूर्व लडाखमध्ये भारतीय लष्कराने चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर लडाख सेक्टरमध्ये पहिली K9-वज्र स्वयंचलित होवित्झर रेजिमेंट तैनात केली आहे. ही K9-वज्र स्वयंचलित होवित्झर तोफ शत्रूच्या लक्ष्यांवर सुमारे 50 किमीवर हल्ला करू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT