देश

‘अरुणाचल’जवळ चीनने वसविली गावे; उपग्रहाच्या छायाचित्रांद्वारे कुरापत उघडकीस

वृत्तसंस्था

लडाख - प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) चीनने तीन गावे वसविल्याची माहिती उघड झाली आहे. त्याची छायाचित्रे उपग्रहाने टिपली आहेत.

पूर्व लडाखमध्ये तणावाच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर चीनने पुन्हा एकदा कुरापत काढली आहे. ज्या ठिकाणी चीनने ही तीन गावं वसविली आहेत, तो भाग अरुणाचल प्रदेशातील बमलापासून सुमारे पाच किलोमीटर दूर आहे. ‘एनडीटीव्ही’ या वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे. या गावांची उपग्रहांनी टिपलेली छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. चीनच्या या कुरापतीमुळे दोन्ही देशांतील संबंधातील गुंतागुंत अधिक वाढू शकते. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भूतानच्या ताब्यातील भागामध्ये चीनने यापूर्वी काही गावे वसविली होती. भूतानमधील हा भाग २०१७ मध्ये भारत-चीनमधील डोकलाममध्ये झालेल्या संघर्षाच्या ठिकाणापासून केवळ सहा किमी दूर होता.

“भारताच्या सीमेलगतच्या भागात हान चीनी आणि तिबेटमधील कम्युनिस्ट पक्षाच्या लोकांची वस्ती निर्माण करुन आपला क्षेत्रीय दावा मजबूत करण्याच्या धोरणावर काम करत आहे. याद्वारे सीमवेर घुसखोरी वाढवण्याचाही चीनचा उद्देश आहे,`` असे मत संरक्षण विषयक तज्ज्ञ ब्रह्म चेलानी यांनी व्यक्त केले आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वर्षभरातील बांधकाम
या भागात १७ फेब्रुवारी २०२० पर्यंत केवळ एक गाव दिसत होते. नव्याने घेतलेल्या छायाचित्रांत तीन गावे वसविण्यात आल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक गावांतील घरांची संख्या ५०च्या आसपास आहे. तिन्ही गावे एकमेकांपासून साधारणतः एक किलोमीटर अंतरावर आहेत. या गावांसाठी रस्तेही करण्यात आल्याचे छायाचित्रांत दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saving Scheme : सरकारी हमीची सुरक्षित गुंतवणूक योजना! मिळेल ८२,००० रुपये व्याज आणि १.५ लाखांची करसवलत

जिल्हा परिषद शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, प्रलंबित बदली प्रक्रिया लवकरच सुरू होणार, तीन वर्षांची प्रतीक्षा संपणार?

Latest Marathi News Live Update : संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय- सुनील तटकरे

Thane Politics: काँग्रेसला जबर धक्का! ११ नगरसेवकांची पक्षाला सोडचिठ्ठी, भाजपात दाखल

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा हट्ट अन् भिकेला लागले खेळाडू... BCCI शी पंगा घेणं पडलं महागात, याला म्हणतात 'तोंड दाबून बुक्क्याचा मार'...

SCROLL FOR NEXT