Viral news  esakal
देश

Viral : ज्युस मागवला वेटर फिनाईल घेऊन आला! 7 ग्राहक थेट रुग्णालयात

सध्या सोशल मीडियावर जी घटना व्हायरल झाली आहे ती ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

China Juice Bar waitress blunder viral 7 customers hospitalised : हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर वेटरला ऑर्डर दिल्यानंतर त्यात गोंधळ होणं असे बऱ्याचदा घडते. मात्र सध्या सोशल मीडियावर जी घटना व्हायरल झाली आहे ती ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. त्यात वेटरला त्या ग्राहकांनी ज्युसची ऑर्डर दिली खरी पण तो जे घेऊन आला त्यामुळे त्यांना थेट रुग्णालयात दाखल व्हावं लागलं आहे.

ही घटना आहे चीनमधील शेजियांग प्रांतातील एका हॉटेलमधील. सध्या ते हॉटेल आणि त्यात घडलेली घटना नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे. ज्युससाठी प्रसिद्ध असणाऱ्या त्या हॉटेलमध्ये ७ जणं गेली. त्यांनी वेटरला ज्युसची ऑर्डरही दिली. मात्र वेटरनं ज्युस ऐवजी त्यांना फ्लोअर क्लिन करण्याचे लिक्विडच दिले. विशेष म्हणजे ते पिताना त्या ग्राहकांच्याही ते लक्षात आले नाही. मात्र त्यानंतर जे घडले त्यामुळे त्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागले आहे.

Also Read - T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यानं तो ज्युस तयार केला त्याला रंगाधळेपणा असल्याचे सांगण्यात आले आहे. त्या ग्राहकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. ग्राहकांनी तो ज्युस घेतल्यानंतर त्यांच्या पोटात बिघाड झाला. त्यांनी उलट्या करण्यास सुरुवात केली. चौकशीनंतर कळले की, तो ज्युस नसून फ्लोअर क्लिन करण्याचे फिनाईल आहे.

सोशल मीडियावर त्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याची चर्चा सुरु झाली आहे. वुकोंग नावाचे ग्राहक आपल्या कुटूंबासमवेत त्या हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी त्या वेटरनं त्यांना ज्युसच्या वेगळ्याच बॉटल दिल्याचे दिसून आले. याप्रकरणाची चौकशी स्थानिक पोलीस प्रशासन करत असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT