manmohan singh  
देश

चीन सीमेवर असून सरकार लपवणूक करतंय; मनमोहन सिंगांचं टीकास्त्र

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज गुरुवारी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी मोदींवर निशाणा साधत म्हटलंय की, या सरकारचा राष्ट्रवाद हा पोकळ आहे. पुढे त्यांनी देशातील सद्य आर्थिक स्थितीबाबतही चिंता व्यक्त करत म्हटलंय की, या सरकारला आर्थिक धोरणांबाबत काहीही समज नाहीये. शेजारील देश चीन एका महिन्यापासून सीमेवर बसलेला आहे मात्र, या गोष्टीला दाबण्याचेच प्रयत्न केले जात आहेत. पुढे माजी पंतप्रधानांनी (Manmohan Singh) म्हटलंय की, भाजपच्या नेतृत्वातील या सरकारकडे (BJP-led Central Government) कसल्याही प्रकारची आर्थिक समज नाहीये. केवळ एवढंच नव्हे तर परराष्ट्र नीतीबाबत देखील हे सरकार सफशेल अपयशी ठरलं आहे.

परराष्ट्र नीती, महगाई आणि बेरोजगारी

शेतकरी आंदोलन, परराष्ट्र धोरण, महगाई तसेच बेरोजगारीसहित इतर अनेक मुद्यांवर सरकारवर टीकास्त्र सोडताना मनमोहन सिंग यांनी म्हटलंय की, राजकीय लाभ प्राप्त करण्यासाठी काँग्रेसने कधीच देशाला विभाजित केलं नाही तसेच कधीही सत्यही लपवलं नाही. फिरोजपूरमध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेमध्ये त्रुटी निर्माण झाल्याच्या प्रकरणावर ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या सुरक्षेवरुन भाजप मुख्यमंत्री चन्नी तसेच राज्यातील लोकांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी म्हटलंय की, लोकांना काँग्रेसचे चांगले काम नक्कीच लक्षात आहे. देशात सध्या गरीब आणखी गरीब होत चालला आहे तर श्रीमंत पहिल्यापेक्षा अधिक श्रीमंत होत चालले आहेत.

'समस्यांसाठी नेहरुंना जबाबदार ठरवणारं सरकार'

मनमोहन सिंग यांचा हा व्हिडीओ 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पंजाब विधानसभेच्या मतदानापूर्वी समोर आला आहे. पंजाब विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रचार सध्या जोरदार सुरु आहे. त्याठिकाणी पंतप्रधान मोदी सातत्याने सभा घेत आहेत. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मनमोहन सिंग यांनी आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलंय की, एकीकडे देश महगाई आणि बेरोजगारीच्या समस्येशी दोन हात करत आहेत. तर दुसरीकडे साडेसात वर्षांपासून सत्तेवर बसलेलं हे सरकार आपल्या चुका स्विकारून त्या सुधारण्याऐवजी लोकांच्या समस्यांसाठी आता देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंना दोषी ठरवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1500 हिंदू मुलींचं धर्मांतर करणारा छांगूर उर्फ पीर बाबा कसा झाला 300 कोटींचा मालक? ATS तपासातून धक्कादायक माहिती उघड

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये निरीक्षण गृहतून मुलगी बेपत्ता, सुरक्षा यंत्रणेवर उठले सवाल

Viral Video: लोकांनी ऊर्जामंत्र्यांना विचारले २४ तासांत फक्त ३ तास ​​वीज मिळते... मंत्री म्हणाले जय श्रीराम... व्हिडिओ व्हायरल

Pune Cyber Police : नवीन सायबर ठाण्यांच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी : आमदार सिद्धार्थ शिरोळे

Tobacco Trade Ban : तंबाखूच्या बेकायदेशी विक्रीवर आणणार प्रतिबंध; ‘वर्ल्ड ॲन्टी काउंटर फिटिंग डे’निमित्त ‘पीएमआय इन इंडिया’चा मनोदय

SCROLL FOR NEXT