देश

'तीस दिन में पैसा डबल बाबूभैया'; पाच लाख भारतीयांना 150 कोटींचा चूना!

विनायक होगाडे

दिल्ली : दिल्ली पोलिसांनी एका चीनी कंपनीद्वारे चालवल्या जाणाऱ्या एका मनी लॉंड्रींग स्कॅमचा खुलासा केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन चार्टर्ड अकाउंटंट, एक तिबेटी महिला आणि 8 इतर लोकांना अटक करण्यात आली आहे. भारतात जवळपास 5 लाख लोकांना 'गुंतवणूकी'च्या नावावर गंडा घालण्यात आला आहे. तसेच त्यांच्याशी निगडीत डेटा देखील चोरण्यात आला आहे. दिल्ली पोलिस कमिशनर एसएन श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, फक्त दोन महिन्यांच्या दरम्यानच 150 कोटी रुपयांचा हा गंडा घातला गेलाय. (Chinese Money scam that cheated 5 lakh Indians of Rs 150 crore busted by delhi police)

पोलिसांनी सांगितलंय की, वेगवेगळे अकाऊंट आणि पेमेंट गेटवेमध्ये जमा केले गेलेले 11 कोटी रुपये ब्लॉक करण्यात आले आहेत. गुरुग्राममध्ये काम करणाऱ्या सीएकडे 97 लाख रुपये कॅश देखील जप्त करण्यात आली आहे. या सीएने चीनी घोटाळेबाजांसाठी 110 हून अधिक खोट्या कंपन्या बनवल्या होत्या.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या ऍपवरुन हा गंडा घालण्यात आला आहे त्यामध्ये गुंतवणूक केल्यास जबरदस्त रिटर्न्स मिळण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. फक्त 24-35 दिवसांतच केलेली गुंतवणूक डबल करण्याचा दावा केला जात होता. त्यांच्याजवळ अशा काही स्कीम्सदेखील होत्या ज्या तासांचा अथवा दिवसांचा हिशेब करुन रिटर्न्स देत होत्या. त्यांच्याजवळ 300 रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंत पैसे गुंतवण्याचे पर्याय उपलब्ध होते. पोलिसांचं म्हणणं आहे की, 'पॉवर बँक' नावाचे एक ऍप गेल्या काही दिवसांपासून गूगल प्ले स्टोअरवर चौथ्या क्रमांकावर ट्रेंडींग करत होतां. ते याच हेराफेरी करणाऱ्या लोकांचं ऍप आहे.

चीनमध्ये आहे ऍपचा सर्व्हर

या घोटाळ्याबाबत बोलताना डीसीपी अन्येष रॉय यांनी म्हटलंय की, सायबर सेलने अनेक सोशल मीडिया पोस्टमधून माहिती घेतली. लोक पॉवर बँक आणि EZ प्लॅन या दोन ऍपबाबत तक्रार करताना दिसत होते.

एसीपी आदित्य गौतम यांच्या नेतृत्वातील टीमने यासंदर्भातील आवश्यक त्या तांत्रिक गोष्टींचा अभ्यास केला. डीसीपींनी म्हटलं की, EZPlan नावाचं एक ऍप www.ezplan.in या वेबसाईटवर उपलब्ध होतं. तर पॉवर बँक बेंगलोरमधील बेस्ट टेक्नोलॉजी स्टार्टअप असल्याचा दावा करत होता. मात्र, तपासामध्ये या ऍप्सचे सर्व्हर्स हे चीनमध्ये सापडले आहेत.

ऍप इन्स्टॉल करण्यासाठी अनेक परवानगींची बंधनं

हे ऍप्स इन्स्टॉल करताना अनेक परवानग्या मागितल्या जायच्या. कॉन्टॅक्ट्सपासून ते कॅमेऱ्यापर्यंतच्या सगळ्या परवानग्या एक्सेप्ट केल्यानंतरच हे ऍप सुरु व्हायचंय या ऍपवर जास्तीतजास्त लोकांना आणण्यासाठी सुरुवातीला ऍपवर 5 ते 10 टक्के रिटर्न्स देखील दिले गेले होते. लोकांना असं वाटलं की ही स्कीम एकदम चांगली आहे. त्यानंतर जास्तीतजास्त लोकांनी यामध्ये पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. ज्याक्षणी अकाउंटमध्ये मोठी रक्कम जमा व्हायची त्यावेळीच हे ऍप त्या अकाउंटला ब्लॉक करायचं, त्यामुळे अनेक लोकांच्या पैशांना यापद्धतीनेच गंडा घातला गेला.

सोशल मीडियाच्या माध्यमातून केला प्रचार

जेंव्हा लोकांना या ऍपबाबत तुम्हाला कुठून माहिती मिळाली असं विचारलं गेलं तेंव्हा समजलं की, घोटाळेबाजांनी अनभिज्ञ लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हॉट्सऍप, टेलीग्राम इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर मॅसेज केले. मॅसेजमध्ये त्यांना लिंक पाठवून आकर्षित केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोल्हापुरी चप्पल जगभरात नेण्यासाठी 'प्राडा'शी महत्त्वपूर्ण करार, महाराष्ट्र-कर्नाटकातील कारागीर बनविणार चप्पल; लिडकॉम-लिडकारचा सहभाग

Kapil Dev : ''प्रत्येकाला पैसा हवाय, पण IPL पेक्षा देशासाठी खेळणं महत्त्वाचं''; भारताच्या पराभवावर काय म्हणाले कपिल देव?

स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेतून कलाकारांचा कमबॅक ! माधवीचा रॉयल लूक चर्चेत तर मुख्य भूमिकेत 'ही' अभिनेत्री

PG Medhe Passes Away : सहकारी साखर उद्योगातील नस असलेले पी. जी. मेढे यांचे निधन, राजू शेट्टींना व्यक्त केला शोक

IND vs UAE U19 : ६,६,६,६,४,४,४,४! वैभव सूर्यवंशी गरजला... युएईच्या गोलंदाजांना धु धु धूतला, झळकावली फिफ्टी

SCROLL FOR NEXT